राष्ट्रवादीत भूकंप? भुजबळांचं मोठं वक्तव्य; ‘ज्या पद्धतीने वागणूक दिली आणि अपमानित केलं जातं त्यावरुन मी दु: खी’

"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना सुद्धा मी होतो आणि अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यावेळेला सुद्धा त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली. सर्व म्हणत आहेत तर ठीक आहे, मी राहीन तुमच्यासोबत, असं सांगितलं. मी त्यांच्याबरोबर राहून पुन्हा सर्वांचे वार मीच झेलले", असं छगन भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादीत भूकंप? भुजबळांचं मोठं वक्तव्य; 'ज्या पद्धतीने वागणूक दिली आणि अपमानित केलं जातं त्यावरुन मी दु: खी'
छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Dec 16, 2024 | 5:38 PM

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे अतिशय अभ्यासू, अनुभवी आणि आक्रमक नेते आहेत. पण तरीसुद्धा त्यांना मंत्रिपदातून डावलण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी नाशिकमध्ये रस्त्यावर आंदोलन केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर छगन भुजबळ यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी छगन भुजबळ यांनी मंत्रिपदात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. ते प्रचंड संतापले आहेत. तसेच भुजबळ यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता आपल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत छगन भुजबळ आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. भुजबळ यांनी आजच्या पत्रकार परिषदतेनंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. “मंत्रिमंडळात आपल्याला स्थान दिलं नाही. मला ज्या पद्धतीने वागणूक दिली आणि अपमानित केलं जातं त्यावरुन मी दु: खी आहे”, असं छगन भुजबळ स्पष्ट म्हणाले.

“मी सातवेळा आमदार म्हणून निवडून आलो आहे. मंत्रिमंडळात मला समाविष्ट न केल्यामुळे राज्यात ओबीसी, इतर मागासवर्गीय आणि मतदारसंघातील लोकं फार क्रोधित आणि दु:खी झालेले आहेत. लोकं रस्त्यावर यायला लागली आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांना काही सांगायला पाहिजे आणि काय असेल ते विचारलं पाहिजे त्यामुळे बुधवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार”, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

‘प्रश्न हा मंत्रिपदाचा नाही, ज्या पद्धतीने…’

“एक लक्षात घ्या, मी केवळ मंत्रिपदावरुन, मंत्रीपद मला दिलं किंवा नाही दिलं म्हणून नाराज नाही. माझ्यासाठी अनेक वेळा अशी मंत्रिपदं आली आणि गेली. मी विरोधी पक्षनेता म्हणून सुद्धा या विधीमंडळात काम केलेलं आहे. एकटा शिवसेनेचा आमदार असताना 85 ते 90 जणांना अंगावर घ्यायचं काम केलेलं आहे. प्रश्न हा मंत्रिपदाचा नाही. ज्या पद्धतीने वागणूक दिली जाते आणि अपमानित केलं जातं त्यावरुन मी दु: खी आहे”, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

‘अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यावेळेला सुद्धा…’

“मंत्रिपद येतात आणि जातात. मी तर अनेकवेळा मंत्रिपदं भूषविली आहेत. मी 1991 मध्ये पहिल्यांदा मंत्री झालो होतो. मुख्यमंत्री झालो, मंत्री झालो, सगळं झालं, परत खाली आलो, परत वरती आलो, प्रश्न असा आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना सुद्धा मी होतो आणि अजित पवार जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यावेळेला सुद्धा त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली. सर्व म्हणत आहेत तर ठीक आहे, मी राहीन तुमच्यासोबत, असं सांगितलं. मी त्यांच्याबरोबर राहून पुन्हा सर्वांचे वार मीच झेलले”, असं छगन भुजबळ म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.