नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही अशा प्रकारे परिस्तिती हाताळावी;  छगन भुजबळांनी केली नाशिकच्या पूरपरिस्थितीची पाहणी

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने शहर व जिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीसह जिल्ह्यातील नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी आज नाशिक गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेत. पूरपरिस्थितीच्या नियोजनाबाबत सूचना केल्या आहेत.

नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही अशा प्रकारे परिस्तिती हाताळावी;  छगन भुजबळांनी केली नाशिकच्या पूरपरिस्थितीची पाहणी
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 5:31 PM

नाशिक : नाशिक(Nashik) जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. संततधार सुरु असलेल्या पावसामुळे धरणसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याबाबत दर तासाला आढावा घेऊन नागरिकांना पुराची( flood) भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्याटप्प्याने धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वय ठेवून पूरपरीस्थीती हाताळावी अशा सूचना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी  नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना दिल्या आहेत.

गोदावरीसह जिल्ह्यातील नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झालेय

नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असल्याने शहर व जिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीसह जिल्ह्यातील नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी आज नाशिक गोदावरीच्या पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेत. पूरपरिस्थितीच्या नियोजनाबाबत सूचना केल्या आहेत.

टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग करण्यात यावा

जिल्हाधिकारी यांच्या भेटी दरम्यान छगन भुजबळ यांनी पुराची भीषणता जाणवणार नाही यासाठी टप्याटप्याने पाण्याचा विसर्ग करण्यात यावा. गोदावरी नदीत निर्माण झालेल्या पानवेलींमुळे निफाड तालुक्यातील बंधाऱ्याना धोका निर्माण होत असून त्या तातडीने हटविण्यात याव्यात. नाशिक शहरातील धोकादायक वाड्यातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासोबतच पडलेल्या वाड्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करण्यात यावा. तसेच लासलगाव-विंचूरसह १६ गावे पाणीपुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी नांदूरमध्यमेश्वर धरणाचे एक गेट बंद करण्यात यावे अशा सूचना केल्या.

जीवितहानी टाळण्यासाठी पूरपरीस्थिती पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या तसेच धोकेदायक पुलांवरून जाणाऱ्या नागरिकांना आळा घालावा

त्याचबरोबर निफाड तालुक्यातील देवगाव येथील कॅनॉल शेजारी सुमारे १५०० एकर क्षेत्रात पाणी साचले आहे. याठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी चर काढण्यात यावा. येवला तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पालखेड डावा कालव्याच्या पाण्याने येवल्यातील बंधारे भरून द्यावे. त्याची सुरुवात ४६ ते ५२ पासून सुरवात करण्यात यावी. चांदवड तालुक्यातील केद्राई धरण भरल्याने केद्राईचे पाणी आजपासून दरसवाडी मध्ये सोडावे. त्यामुळे मांजरपाडयाचे येणारे पाणी पुढे दरसवाडी कालव्याच्या माध्यमातून पाणी प्रवाहित होऊन डोंगरगाव पर्यंत पोहोचणार आहे. तसेच जीवितहानी टाळण्यासाठी पूरपरीस्थिती पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या तसेच धोकेदायक पुलांवरून जाणाऱ्या नागरिकांना आळा घालण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा याबाबत चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.