छगन भुजबळ यांनी प्रथमच स्पष्टपणे दिले या पक्षासोबत जाण्याचे संकेत, पुढील वाटचाल…
Chhagan Bhujbal Interview: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी कोरोना आला. त्यांनी दोन वर्ष चांगले काम केले. परंतु त्यांचा शारीरिक आजार हा त्यांना अडचणीचा होता. त्यामुळे त्यांना काम करणे अवघड होते. त्यांना मंत्रीपदाचा अनुभव नव्हता. पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केले.

Chhagan Bhujbal Interview: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यानंतर ते पक्षात नाराज आहे. अनेक वेळा त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. परंतु पुढील वाटचाल कशी असणार? याबाबत स्पष्टपणे काही सांगितले नव्हते. आता मात्र एका मुलाखतीतून छगन भुजबळ यांनी पुढील वाटचाल कोणत्या पक्षासोबत असणार? त्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. त्यावरुन भुजबळ यांची भविष्यातील वाटचाल भारतीय जनता पक्षासोबत असणार आहे, असे स्पष्ट संकेत मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची आज जाहीर प्रकट मुलाखत पुण्यात घेण्यात आली. जाधवर इंस्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या युवा संसद कार्यक्रमात भुजबळ यांची मुलाखत झाली.
भुजबळ काय म्हणाले?
एका प्रकट मुलाखतीत छगन भुजबळ यांना त्यांच्या पुढील वाटचालीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुमची पुढची भुमिका काय? भाजपसोबत काम करण्यास काही अडचण येणार नाही का? यावर बोलताना छगन भुजबळ यांनी एक शेर ऐकवला. ते म्हणाले, ‘सुना है आज समुंदर में बडा गुमान आया है. उधरही ले चलो अपनी कस्ती जँहा तुफान आ गया है…’ भाजपची वेगळी विचारसरणी आहे, त्यांच्यासोबत काम करता येईल का? त्यावर भुजबळ म्हणाले की, भाजप बरोबर काम करण्यात मला अडचण नाही. मंत्रात फुले यांची प्रतिमा लावणे असो की भिडे वाडा, फुले वाडा याबाबतचा प्रश्न मार्गी असो ते मार्गी लावण्यासाठी या सरकारने प्रयत्न केले. भाजप जर फुले, शाहू, आंबेडकर यांचे काम करत आहे. ओबीसीसाठी काम करत आहे. मग मला त्यांच्यासोबत काम करण्यास अडचण नाही, असे स्पष्टपणे भुजबळ यांनी म्हटले.
ओबीसींचा पक्ष अशी प्रतिमा भाजप करत आहे, त्यांना भुजबळ यांची सोबत हवी का? त्यावर छगन भुजबळ म्हणाले, भाजपने अनेक ओबीसी नेत्यांना तिकीट दिले. मंत्रीपदे दिली. ६० टक्के ओबीसी भाजपसोबत आहे.




उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी कोरोना आला. त्यांनी दोन वर्ष चांगले काम केले. परंतु त्यांचा शारीरिक आजार हा त्यांना अडचणीचा होता. त्यामुळे त्यांना काम करणे अवघड होते. त्यांना मंत्रीपदाचा अनुभव नव्हता. पण त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केले.
बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे माझा छगन शरद घेऊन गेला. बाळासाहेबांचे शेवटपर्यंत माझ्यावर प्रेम होते. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या कडून मला खूप शिकायला मिळाले. शरद पवारांना का सोडले? त्यावर ते म्हणाले, मी त्यांना का सोडले ते विचारू नका. शरद पवार भाजपला आय लव्ह म्हणत होते. मात्र लग्न करायला तयार नव्हते. या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी आम्ही तरी कुठे लग्न केले आहे. आम्ही फक्त त्यांच्या बरोबर आहोत, अशी मिश्कीलपणे प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा…
आता छगन भुजबळ राज्यपाल होणार का? स्पष्टपणे भुजबळांनी दिले उत्तर