छगन भुजबळ यांचे कट्टर विरोधक माणिकराव शिंदेंनी घेतली मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट, भुजबळांना डिवचले…

नियतीला कदाचित सरकार येऊन सरकारमध्ये नसणे मोठा अपमान त्यांना द्यायचा होता म्हणून कदाचित येवल्यामध्ये त्यांना विजय मिळाला. त्यांची लढत कशी झाली हे जनतेला माहिती आहे, या शब्दांमध्ये माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळ यांना डिवचले.

छगन भुजबळ यांचे कट्टर विरोधक माणिकराव शिंदेंनी घेतली मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट, भुजबळांना डिवचले...
ज्येष्ठ नेते छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Dec 22, 2024 | 5:50 PM

नाशिक जिल्ह्यातील दोन राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांमध्ये नेहमीच आरोप प्रत्यारोप होत होते. छगन भुजबळ अन् माणिकराव शिंदे हे राजकारणातील कट्टर विरोधक आहेत. आता छगन भुजबळ यांनी मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे माणिकराव शिंदे यांनी भुजबळ यांना डिवचण्यासाठी माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली. त्यांच्या नागरी सत्कारीची तयारी सुरु केली आहे. सरकार येऊन सरकारमध्ये नसणे हा भुजबळांचा मोठा अपमान असल्याचा टोला माणिकराव शिंदे यांनी लगावला. नियतीला कदाचित सरकार येऊन सरकारमध्ये नसणे मोठा अपमान त्यांना द्यायचा होता म्हणून कदाचित येवल्यामध्ये त्यांना विजय मिळाला. त्यांची लढत कशी झाली हे जनतेला माहिती आहे, असे त्यांनी म्हटले.

येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत छगन भुजबळ विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माणिकराव शिंदे यांच्यात लढत झाली होती. त्यात माणिकराव शिंदे पराभूत झाले. आता भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्याचा आनंद त्यांना होत आहे. त्यांनी येवलामध्ये माणिकराव कोकाटे यांचा नागरी सत्कार आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सरकारमध्ये नसणे हा भुजबळांचा मोठा अपमान असल्याचे म्हटले आहे. माणिकराव कोकाटे पालकमंत्री झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

माणिकराव कोकाटे म्हणतात, जबाबदारी मोठी…

राज्याचे कृषिमंत्री पद मिळाले त्याचा आम्हाला आनंद आहे, असे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, नाशिक जिल्ह्याला अजितदादांनी फार मोठा आशीर्वाद दिला आहे. जिल्ह्यास दोन मंत्रिपद मिळाले आहे. जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहे. नाशिक जिल्हा बँकेवर फार मोठा बोजा आहे. विधानसभा उपाध्यक्ष असताना झिरवाळ साहेबांची राज्यभरात वेगळी ओळख होती.

हे सुद्धा वाचा

भुजबळ यांची भेट घेणार

छगन भुजबळ यांच्यावर बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले, अजित दादा भुजबळ यांना कुठेतरी संधी देतील. आम्ही परवा जाणार आहोत. भुजबळ यांची भेट घेणार आहोत. त्यासाठी दादांची आम्ही परवानगी घेतली आहे. दादा आणि साहेब परत एकत्र आले पाहिजे. त्यांना केंद्रात संधी मिळाली तर केंद्राकडूनही निधी मिळेल. कुठेतरी दुरावा झाला तो जवळ आणण्यासाठी भुजबळ साहेबांकडे गेले पाहिजे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.