मनुस्मृतीविरोधात भुजबळांचाही एल्गार; काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर समता परिषदेचाही विरोध

भाजप मोठा भाऊ आम्हाना मान्य आहे. त्यांचे मागील निवडणुकीत शंभर पेक्षा जास्त आमदार होते. त्यामुळे महायुतीमध्ये त्यांना जास्त जागा द्यावा लागणार आहे, हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. तेच आम्हाला अपेक्षित आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

मनुस्मृतीविरोधात भुजबळांचाही एल्गार; काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर समता परिषदेचाही विरोध
chagan bhujbal
Follow us
| Updated on: May 28, 2024 | 1:01 PM

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने नुकताच तिसरी ते बारावी वर्गाचा अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर केला आहे. त्यामध्ये मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा अध्याय पाठ करायला लावा, अशी शिफारस केली आहे. त्यानंतर शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीची श्लोक शिकवले जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावरुन विविध राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, संभाजी ब्रिगेडकडून मनुस्मृतीचे श्लोक शिकवण्यास विरोध केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाचे मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. आमच्या विचारधारेला हे मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ

समता परिषदेच्या विचारधारेशी मनुस्मृती विसंगत आहे. आमच्या विचारधारेत ते बसत नाही. यामुळे शालेय अभ्यासक्रमात ते लागू करण्यास आमचा विरोध असणार आहे, असे छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी विनाकरण संभ्रम निर्माण केला जात असल्याचे म्हटले आहे.

विधानसभेसाठी किती जागा मिळणार

लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चार जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी विधानसभेला चांगल्या जागा देण्याचे आश्वासन मिळाले होते. त्या आश्वासनानुसार समाधानकारक जागा मिळाव्या, अशी अपेक्षा प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. आम्हाला जे सांगितले आहे, त्यानुसार जागा मिळायला हव्यात, असे भुजबळ म्हणाले. त्याचवेळी भाजपला जास्त जागा मिळणार असल्याचे त्यांनी मान्य केले.

हे सुद्धा वाचा

भाजप मोठा भाऊ, त्यांच्या जागा जास्तच

भाजप मोठा भाऊ आम्हाना मान्य आहे. त्यांचे मागील निवडणुकीत शंभर पेक्षा जास्त आमदार होते. त्यामुळे महायुतीमध्ये त्यांना जास्त जागा द्यावा लागणार आहे, हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्षांना सन्मानपूर्वक जागा देण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. तेच आम्हाला अपेक्षित आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

विधान परिषद निवडणूक महायुती म्हणून किंवा महाविकास आघाडी म्हणून लढवली जात नाही. यामुळे प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जाहीर करत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले.

निवडणुका संपताच छगन भुजबळ एक्शन मोडमध्ये

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे. भुजबळ यांच्या बंगल्यावर राज्यातील ओबीसी नेते बैठकीस येणार आहे. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ही बैठक होणार आहे. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि इतर ओबीसी नेते घेणार भुजबळ यांची भेट घेणार आहेत.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.