‘अवहेलना सहन करून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले…’, छगन भुजबळ नेमके काय म्हणाले?

chhagan bhujbal: ईव्हीएमवर घोळाचा आरोपाला भुजबळ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते. आता त्याच्यात गडबड आहे. आपल्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रकार आहे. ईव्हीएम निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणे सोपे आहे.

'अवहेलना सहन करून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले...', छगन भुजबळ नेमके काय म्हणाले?
chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 11:13 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील सरकार स्थापनेबाबत महत्वाचा दावा केला आहे. राज्यात महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. ज्या वेळेस 3 पक्षांची युती असते तेव्हा सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. त्या निर्णयासाठी काही वेळेस महिना, महिना देखील लागला आहे. त्या मनाने हा वेळ काहीच नाही. येत्या दोन-चार दिवसांत शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. त्यासंदर्भातील फॉर्म्युला आज निश्चित होणार आहे. भाजपचे 132 आमदार निवडून आले आहेत, त्यामुळे त्यांचे मंत्री जास्त असणार हे स्वाभाविक आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

फडणवीस यांचे भरभरुन कौतूक

भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी बाहेरुन काम करणार असल्याचे सांगितले. परंतु पक्षाने आदेश दिला आणि ते उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी ती एक प्रकारची अवहेलना सहन करून ते उपमुख्यमंत्री झाले. परंतु त्यांनी पूर्णपणे कामाला झोकवून दिले. आता महायुतीला पूर्ण बहुमत मिळून देण्याचे काम त्यांनी केले. सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर कुठे गदा येऊ नये यासाठी फडणवीस यांनी सहकार्य केले आहे, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

मोठ्या वर्गाची मते मिळाली नाही

ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी मी काम केले. त्यामुळे काही लोक मला प्रचंड टार्गेट करत आहे, असे भुजबळ यांनी सांगितले. ते म्हणाले, निवडणुकीत मनोज जरांगे स्वत: माझ्या मतदार संघात फिरत होते. रात्री 2 वाजेपर्यंत ते बैठका घेत होते. जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला. मला एका मोठ्या वर्गाची मते मिळाली नाही.

हे सुद्धा वाचा

लाखाचे मताधिक्य हवे होते

ईव्हीएमवर घोळाचा आरोपाला भुजबळ यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, लोकसभेला ईव्हीएम बरोबर होते. आता त्याच्यात गडबड आहे. आपल्या पराभवाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रकार आहे. ईव्हीएम निर्जीव वस्तू आहे, त्याच्यावर खापर फोडणे सोपे आहे. 2019 मधील विधानसभा निवडणुकीत मला 56 हजारांचे मताधिक्य होते. मग आता माझे मतदान 2 लाखांपर्यंत जायला हवे होते. ईव्हीएममध्ये गडबड असती तर मला एक लाख जास्त मते मिळायला हवी होती. मग माझे मताधिक्य कमी का झाले? असे भुजबळ यांनी सांगितले.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.