Sharad Pawar: शरद पवारांसोबत गेलो अन् मुख्यमंत्रीपद गेलं… छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट काय?

Chhagan Bhujbal on sharad pawar: १९९१ साली शिवसेना सोडून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप शिवसेनेच्या विरोधात काम केले म्हणून अनेक वेळा माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले होते. १९९५ मध्ये युती सरकार आले. मला विधान परिषदेतून आमदार करण्यात आले. विरोधी पक्षनेता म्हणून काम केले.

Sharad Pawar: शरद पवारांसोबत गेलो अन् मुख्यमंत्रीपद गेलं... छगन भुजबळ यांचा गौप्यस्फोट काय?
chhagan bhujbal sharad pawar
Follow us
| Updated on: May 20, 2024 | 7:27 AM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेली मुलाखत रविवारी प्रसिद्ध दिली. त्या मुलाखतीत २००४ मध्ये छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपद दिले असते तर पक्ष फुटला असता, असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे. शरद पवार यांच्यासोबत गेलो नसतो तर राज्याचा मुख्यमंत्री झालो असतो. काँग्रेसकडून आपणास तसे सांगण्यात आले होते, असा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ

माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, १९९१ साली शिवसेना सोडून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भाजप शिवसेनेच्या विरोधात काम केले म्हणून अनेक वेळा माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले होते. १९९५ मध्ये युती सरकार आले. मला विधान परिषदेतून आमदार करण्यात आले. विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. त्यानंतर १९९९ मध्ये काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मी शरद पवार यांच्यासोबत गेलो. त्यावेळी काँग्रेसने मला शरद पवार यांच्यासोबत जाऊ नये म्हणून सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्रीपद देऊ, असेही सांगण्यात आले. परंतु मी पवार साहेबांची साथ दिली. त्यावेळी मी पवार साहेबांबरोबर गेलो नसतो तर मुख्यमंत्री झालो असतो, असे भुजबळ यांनी शरद पवार यांच्या त्या मुलाखतीवर बोलताना सांगितले.

काँग्रेस मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होता…

२००४ मध्ये आम्हाला जास्त जागा असल्याने काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद देण्याची तयार होती. आम्ही तयार होतो पण पवार साहेब बोलत नव्हते, ते नाव घेत नव्हते. त्यांना काय अडचण होती माहीत नाही, असे भुजबळ यांनी म्हटले. तसेच संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव शिवसेनाचा होतो. त्यासाठी त्यांची गटनेतेपदी निवड केली होती. परंतु आधी भाजपने नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव फेटाळल्याचे म्हटले आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले की, आपणास हे माहीत नाही. सर्व चर्चेत उच्चस्तरीय नेते सहभागी होतात, असे भुजबळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरीची जागेवर महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. त्या सभेला प्रचंड गर्दी होती. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. ती सभाही प्रचंड मोठी होती. आता सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.