AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोर्चाचं हे पाहिलं पाऊल, पुढचं पाऊल काय ? छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं…

सत्ताधारी पक्ष आंदोलन करून महामोर्चाला छेद देऊ शकत नाही. लोकांना सगळं कळतं आहे, कोणी आधी मोर्चा जाहीर केला, आधी कोण बोललं हे सगळं लोकांना कळतं आहे असं भुजबळ यांनी म्हंटलं आहे.

मोर्चाचं हे पाहिलं पाऊल, पुढचं पाऊल काय ? छगन भुजबळ यांनी स्पष्टच सांगितलं...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 12:33 PM

मुंबई : मोर्चाची जास्त प्रसिद्धी होऊ नये, माध्यमांचे आणि लोकांचे लक्ष विचलित होऊ नये यासाठी भाजप माफी मांगो हे आंदोलन करून खटाटोप करत आहे असं राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी म्हंटलं आहे. चुका त्यांनी केल्या, राज्यपाल यांच्यापासून मंत्र्यांपर्यन्त चुका करत आहे, सरकार चुका करत आहे, आणि आम्ही काय माफी मागायची असा प्रतिसवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. भाजपचा दिखावा आणि महामोर्चाचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपची नाटकं असल्याचे भुजबळ यांनी म्हंटल आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही आमची दैवत आहे. आणि त्यांचा अपमान होतोय हे आम्ही सहन करणार नाही. ते आजही सगळ्यांच्या हृदयात आहेत, आदर आणि भक्तिभाव आहे त्यामुळे मिरवणूक काढतात तशी यमी मिरवणूक काढली आहे. कार्यकर्त्यांना अडवलं जात नाही, कार्यकर्ते उशिरा निघाले आहे. ट्रेनने येताय त्यामुळे थोडा उशीर होत असल्याचे भुजबळ यांनी म्हंटले आहे.

सत्ताधारी पक्ष आंदोलन करून महामोर्चाला छेद देऊ शकत नाही. लोकांना सगळं कळतं आहे, कोणी आधी मोर्चा जाहीर केला, आधी कोण बोललं हे सगळं लोकांना कळतं आहे.

हे सुद्धा वाचा

महामोर्चा हे पहिलं पाऊल आहे. शेवटचं नाही. हे आंदोलन आक्रोश आहे. याची तीव्रता हळूहळू पाहायला मिळणार आहे. याचे पडसाद हळूहळू वाढत जातील.

हिवाळी अधिवेशनात सुद्धा या आंदोलनाचे पडसाद पडतील, हे सर्व लॉक रस्त्यावर उतरत आहे, बाहेर जाणारे कारखाने, महापुरुषांचा अपमान हे सगळे विषय अधिवेशनात मांडणार आहोतच.

असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोर्चात सहभागी झाल्यानंतर छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.