डॉक्टर दाम्पत्याचे भांडण विकोपाला, मग डॉक्टर पत्नीने असे काही केले की…

| Updated on: Jan 30, 2024 | 12:21 PM

chhatrapati sambhajinagar Crime News | छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागात 40 वर्षीय न्यूरोलॉजिस्ट गोविंद वैजवाडे आणि त्यांची पत्नी डॉ. विनीता वैजवाडे राहतात. या दोघांमध्ये रविवारी रात्री काही कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. या प्रकरणी पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर दाम्पत्याचे भांडण विकोपाला, मग डॉक्टर पत्नीने असे काही केले की...
आगीनंतर गोविंद वैजवाडे यांच्या घरात झालेले नुकसान
Follow us on

छत्रपती संभाजीनगर, दि.30 जानेवारी 2024 | प्रचंड मेहनत करुन दोघे डॉक्टर बनले. मग त्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित सुरु होता. परंतु संसार म्हटले म्हणजे भांड्याला भांडे लागत असते. हे भांडण विकोपाला जाऊ नये, याची काळजी दोघांनी घेण्याची गरज असते. परंतु छत्रपती संभाजीनगरात डॉक्टर पती-पत्नीच्या भांडणाची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. डॉक्टर पत्नीने रागाच्या भरात स्वत:च्या घरालाच आग लावल्याचा प्रकार केला आहे. आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. अखेर डॉक्टर पतीने पतीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

काय घडला प्रकार

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागात 40 वर्षीय न्यूरोलॉजिस्ट गोविंद वैजवाडे आणि त्यांची पत्नी डॉ. विनीता वैजवाडे राहतात. 2019 मध्ये त्यांचे लग्न विनिताशी लग्न झाले होते. या दोघांमध्ये रविवारी रात्री काही कारणावरुन कडाक्याचे भांडण झाले. हे भांडण दोघांचे कॉमन पारिवारिक मित्रांनी सोडवले. ते मित्रही डॉक्टरच आहेत. त्यानंतर वीणा यांना राग शांत करण्यासाठी मित्राच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मग सकाळी त्या परत डॉ. गोविंद यांच्या फ्लॅटवर आल्या. सोमवारी सकाळी सहा वाजता त्यांनी पतीवर राग काढला. त्यासाठी त्यांनी स्वत: घरच पेटवून दिले.

शेजाऱ्यांनी अग्नीशमन दलास बोलवले

गोविंद वैजवाडे यांच्या घरातून आगीचे लोट दिसत होते. यामुळे शेजारील ११ घरांनाही धोका निर्माण झाला. नागरिकांनी अग्नीशमन दलास फोन केला. परंतु अग्नीशमन दलाची गाडी येईपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले. अग्नीशमन दलाच्या गाड्या त्वरित आल्या नसत्यातर संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती.

हे सुद्धा वाचा

डॉ. विनीता गोविंद वैजवाडे या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्या महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. या प्रकरणी डॉक्टर गोविंद यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन डॉ. विनीता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 435, 427 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.