तुम्हाला राज्यात दंगली घडवायच्या आहेत काय?, शरद पवार गप्प का?; संजय शिरसाट यांचे सवाल

Sanjay Shirsat on Sharad Pawar and Jitendra Awhad Statement about Ram : शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर शरद पवार बोलत का नाहीत? असा प्रश्न शिरसाटांनी उपस्थित केला आहे.

तुम्हाला राज्यात दंगली घडवायच्या आहेत काय?, शरद पवार गप्प का?; संजय शिरसाट यांचे सवाल
Follow us
| Updated on: Jan 05, 2024 | 3:03 PM

दत्ता कानवटे, प्रतिनिधी – टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 05 जानेवारी 2024 : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल वक्तव्य केलं. प्रभू राम हे मांसाहारी असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा निषेध केला. तसंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शिरसाट यांनी सवाल केला आहे. शरद पवार यांना दंगली घडवायच्या आहेत का? असा थेट सवाल त्यांनी केला. तसंच या सगळ्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं संजय शिरसाट म्हणालेत.

शिरसाट यांचा शरद पवारांना सवाल

इतरांच्या भावना दुखावून राजकारण साधण्याचे काही जण काम करत आहेत.प्रभू रामाबद्दल केलेल्या विधानामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. हे वक्तव्य का करायला लावलं? राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर हे वक्तव्य वादंग निर्माण करून वातावरण खराब करण्याचं काम सुरु आहे. शरद पवार यावर काही बोलले नाहीत. विरोधक बोलत नाहीत. याचा अर्थ राज्यात जातीय दंगल घडवण्याच्या आहे का?, असा थेट सवाल संजय शिरसाट यांनी शरद पवार यांना विचारला आहे.

“मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार”

काहीच दिवसात राम मंदिराचं उद्घाटन होत आहे. या उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यामुळे सावध राहा. जितेंद्र आव्हाड तुम्हाला या वक्तव्यावर दाखले देण्याची का वेळ आली? राम मंदिरच्या उद्घाटनावेळी हा विषय का काढता? पण या निश्चित कारवाई होईल.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मी या विषयावर चर्चा करणार आहे, असं संजय शिरसाट म्हणाले.

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका केली गेली. त्यांना धमकीही देण्यात आली. यावर बोलताना महंतांनी दिलेली धमकी म्हणजे त्यांनी त्यांची चिड व्यक्त केली आहे, असं शिरसाट म्हणाले.

“प्रत्येकाने दर्शन घ्यावं”

प्रभू रामाच्या दर्शनासाठी रेल्वे सुरू करणं म्हणजे भारतातील प्रत्येकाने या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. हा उद्देश आहे. त्याला पक्षाचं नाव लावू नका. राजकारण करू नका. राम दर्शनाला घेऊन गेल्यावर तुम्हाला राजकारणच आठवतं. धार्मिकतेचे फळ मिळत असेल तर काय वाईट आहे?, असं शिरसाटांनी म्हटलं.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.