धावत्या स्कूल बसमध्ये 35 चिमुकले मुले अन् अचानक लागली आग, आगीच्या घटनेचा थरारक व्हिडिओ

School Bus Fire: घाटनांद्रा येथून शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस निघाली होती. ही बस आमठाणा येथे असताना त्यातून धूर निघू लागला. बस चालकाला ही बाब लक्षात आली. त्याने लागलीच वाहन थांबवले. यावेळी बसमध्ये दोन शिक्षक बसले होते.

धावत्या स्कूल बसमध्ये 35 चिमुकले मुले अन् अचानक लागली आग, आगीच्या घटनेचा थरारक व्हिडिओ
संभाजीनगर जिल्ह्यात स्कूल बसला लागली आग.
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 4:47 PM

Chhatrapati Sambhaji Nagar School Bus Fire: गेल्या काही दिवसांपासून बस अपघाताच्या विविध घटना समोर येत आहे. मंगळवारी मुंबईतील अंधेरीत शाळेच्या मुलांची सहल जात होती. त्या बसचा चालक दारुच्या नशेत होता. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती दुर्घटना टळली होती. आता बुधवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात धावत्या स्कूलबसमधील आगीचा थरार समोर आला आहे. या बसमध्ये 35 मुले होती. दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे या चिमुकल्यांचे जीव वाचला. ही घटना सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ घडली.

बसमध्ये होते 35 विद्यार्थी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील घटना समोर आली आहे. या गावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या धावत्या स्कूल बसने अचानक पेट घेतली. या बसमध्ये तब्बल 35 विद्यार्थी होते. या बसने पेट घेतल्यामुळे धावपळ उडाली. मात्र बसमधील दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे 35 विद्यार्थ्यांचे प्राण वाचले. आमठाणा गावाजवळ बुधवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

हे सुद्धा वाचा

स्कूल बसला लागलेली आग विझवण्यात आली.

नेमके काय घडले?

घाटनांद्रा येथून शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस निघाली होती. ही बस आमठाणा येथे असताना त्यातून धूर निघू लागला. बस चालकाला ही बाब लक्षात आली. त्याने लागलीच वाहन थांबवले. यावेळी बसमध्ये दोन शिक्षक बसले होते. त्यांनी प्रसंगावधान राखत सर्व मुलांना तातडीने खाली उतरवले. सर्व मुले बसमधून खाली उतरवल्यावर काही क्षणात बसला आग लागली.

शेतातील विहिरींना जोडले पाईप

दरम्यान, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला आग लागल्याची वाऱ्यासारखी पसरली. या भागातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातील विहिरीचे पाणी पाईपलाईनला जोडले. त्यानंतर बसवर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. बसमध्ये चौथी ते सातवी वर्गात शिकणारे विद्यार्थी होते. जवळपास परिसरातील तब्बल ५०० मुले खाजगी वाहनाने शाळेत ये-जा करतात.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.