लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरे प्रथमच बोलले…माता, भागिनींवर डाव…
uddhav thackeray: राज्यभरातील तहसील कार्यालयात महिला कागदपत्रे जमा करण्यासाठी गर्दी करत आहेत. या योजनेचा धसका विरोधकांनी घेतला आहे. आता छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसंकल्प मेळावा घेतला. त्यात उद्धव ठाकरे म्हणाले, माता भागिनींवर डाव टाकून फसवण्याचा प्रकार होत आहे...
महाराष्ट्र सरकारने लाकडी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेत महिन्याला 1500 रुपये पात्र महिलांना मिळणार आहे. या योजनेची चर्चा राज्यभरात सुरु झाली आहे. राज्यभरातील तहसील कार्यालयात महिला कागदपत्रे जमा करण्यासाठी गर्दी करत आहेत. या योजनेचा धसका विरोधकांनी घेतला आहे. आता छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी शिवसंकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रथमच भाष्य केले. योजनेचे नाव न घेता माता भागिनींवर डाव टाकून फसवण्याचा प्रकार होत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
पापे लपवण्यासाठी योजना का आणली
निवडणूकमध्ये पापे लपवण्यासाठी आता सरकार योजना आणत आहेत. परंतु या योजनेतून घराघरात वितुष्ट आणण्याचा डाव सरकारने आखला आहे. घरातील मुलींना मोफत शिक्षण मग मुलांना का मोफत शिक्षण दिले जात नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मुलींसाठी योजना आणता पण घराघरात भाऊ बेकार आहे. त्याचा कधी विचार करणार नाही. योजना आणा, पण आरक्षण द्या. महाराष्ट्राचे हक्काचे आरक्षण द्या. सर्व समाजाने आता त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी एकत्र आले पाहिजे.
बोगस योजनांचे भांडाफोड करा
आरक्षणावरती मी आज जाहीर बोलणार आहे. सर्व समाजाला मी विनंती करतो की, मी तुमच्या सर्वांच्या सोबत आहे. आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्वांनी एकत्र या. सगळ्यांना एकत्र बोलवा आणि त्यांना विचारा कुणाला काय पाहिजेत. तुम्ही आणि मी एक आहोत, हे आता गावागावात जाऊन सांगा. त्यांच्या बोगस योजनांचे भांडाफोड करा. राजकरण करत असले तर त्यांचे राजकारण जाळा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आता त्यांना शून्यावर आणा
लोकसभा निवडणुकीत आपण त्यांना 40 वरुन 9 वर आणले. आता सगळे एकत्र या. त्यांना शून्यवर आणा. ती लोक म्हणतात, मी गद्दार झालो तरी चालेल, पण माझी खुर्ची वाचली पाहिजे. परंतु मी म्हणतो, माझी खुर्ची गेली तरी चालेल पण मी गद्दार करणार नाही.