Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SambhajiRaje | ‘राज्यसभा निवडणुकीला उभे राहणार नाही’ छत्रपती संभाजीराजेंची घोषणा, माघार नाही, हा माझा स्वाभिमान!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला दिलेला शब्द पाळला नाही, यावर छत्रपती संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली.

SambhajiRaje | 'राज्यसभा निवडणुकीला उभे राहणार नाही' छत्रपती संभाजीराजेंची घोषणा, माघार नाही, हा माझा स्वाभिमान!
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 11:44 AM

मुंबईः कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी राज्यसभा निवडणुकीत उभे राहणार नसल्याची घोषणा केली आहे. राज्यसभेसाठी (Rajyasabha) माझ्या उमेदवारीला पाठिंबा नाकारताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मला दिलेला शब्द मोडल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री, शिवसेनेचे मंत्री आणि एक खासदार यांच्याशी माझी चर्चा सुरु होती. त्यांच्या सूचना, माझ्या सूचनांचा एक सविस्तर ड्राफ्टही तयार झाला होता. तो ड्राफ्ट पाहून मी कोल्हापुरलाही निघालो होतो. मात्र अचानक संपूर्ण डाव उलटला आणि संजय पवार यांच्या उमेदवारीच्या बातम्या येऊ लागल्या. माझ्यासाठी हा मोठा धक्का ठरला. एक निष्पक्ष नेता म्हणून मी आतापर्यंत समाजाची सेवा केली, मात्र माझी विनंती फेटाळण्यात आली, अशी नाराजी व्यक्त करत संभाजीराजेंनी राज्यसभेच्या निवडणुकीला उभे राहणार नाही, अशी घोषणा केली. मात्र स्वराज्य संघटनेमार्फत समाजाची सेवा करत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही’

राज्यसभेची उमेदवारी मिळवण्याकरिता मी प्रामाणिक प्रयत्न केले, मात्र शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली. ते म्हणाले, पुढचा प्रवास किती खडतर आहे, याची मला कल्पना होती. खासदारकी असतानाही समाजाची मी प्रांजळपणाने भूमिका मांडत होतो. मी पार्श्वभूमी पाहून मी सगळ्या पक्षांना विनंती केली होती. त्यासाठीच मी मुंबईत आलो होतो. दोन खासदार आणि मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मला शिवसेनेत प्रवेश करण्याची विनंती करण्यात आली. मात्र मी अपक्ष म्हणून उभे राहण्यावर ठाम होतो. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवल्यास पाठिंबा देण्याची तयारीही दाखवण्यात आली होती. मात्र त्यानंतर झालेल्या काही बैठकांनंतर मुख्यमंत्र्यांनी अचानक शब्द फिरवले, असा आरोप संभाजीराजेंनी केला.

शिवसेना पुरस्कृत उमेदवाराचीही तयारी

संभाजीराजेंनी शिवसेनेला आणखी एक प्रस्ताव दिला होता, अशी माहिती संभाजीराजेंनी दिली. महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना पुरस्कृत उमेदवारी देण्याची विनंती त्यांनी केली होती. यासाठीही मुख्यमंत्री तयार झले होते. दोन दिवसांनी झालेल्या बैठकीतही त्यांच्या आणि माझ्या सूचनांचा एक फायनल ड्राफ्ट बनला. तो ड्राफ्ट आजही माझ्या मोबाइलमध्ये आहे. मीटिंग सुरु होतानाच माझ्यासमोर पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश करण्याची विनंती करण्यात आली. मात्र मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो… असं संभाजीराजेंनी सांगितलं.. मात्र बैठकीतून निघाल्यानंतर अचानक संजय पवारांच्या उमेदवारीच्या चर्चा सुरु झाल्या, मी मुख्यमंत्र्यांना फोन केले. पण कुणीही मला प्रतिसाद दिला नाही… अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली.

‘मावळ्यांना संघटित कऱणार’

शिवसेनेनं दगाबाजी केल्यानंतर आता मी राज्यसभेची निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा संभाजीराजेंनी केली. ही माघार नसून मी समाजसेवेसाठी तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी २०१९ ची निवडणूक हारल्यानंतर मी महाराष्ट्र फिरलो. ग्रामीम शहरी भागातल्या युवकांना संघटित करण्याची आताही मला संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. आता मी स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. न्यायाकरिता लढणार आहे, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....