शिवप्रेमींनी मालवणमध्ये आणला शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा, प्रशासनाने घेतला असा निर्णय

malvan shivaji maharaj statue: जोपर्यंत शासन या ठिकाणी नवीन पुतळा बसवत नाही, तोपर्यंत आपण या ठिकाणी एखादा पुतळा बसवला पाहिजे, हे आमच्या मनात आले. त्यामुळे हा पुतळा घेऊन आम्ही आलो होतो. परंतु प्रशासनाने त्यास नकार दिला.

शिवप्रेमींनी मालवणमध्ये आणला शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा, प्रशासनाने घेतला असा निर्णय
मालवणमध्ये शिवप्रेमींनी आणला नवीन पुतळा.
Follow us
| Updated on: Aug 29, 2024 | 1:16 PM

सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. त्या घटनेनंतर राज्यात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. महाविकास आघाडीने आंदोलन सुरु केले आहे. सरकारने या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याची भूमिका घेतली आहे. राज्यात या प्रकरणावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप होत असताना छत्रपती संभाजीनगरमधील शिवप्रेमी नवीन पुतळा घेऊन पोहचले. त्यांनी त्या ठिकाणी जोपर्यंत नवीन पुतळा बसवला जात नाही, तोपर्यंत हा पुतळा बसवावा, अशी मागणी केली. परंतु प्रशासाने त्यांची मागणी फेटाळत पुतळा परत पाठवला.

प्रशासनाकडून पुतळा स्वीकारण्यास नकार

मालवण राजकोट किल्ल्यावर बसवण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील शिवप्रेमींनी पुतळा आणला होता. परंतु प्रशासनाने हा पुतळा परत पाठवला आहे. धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांनी हा पुतळा आणला होता. हा पुतळा मालवण नगर परिषदेच्या आवारात आणला गेला होता. परंतु प्रशासनाकडून हा पुतळा स्वीकारण्यास नकार दिला.

संघटनेकडून अशी भूमिका

धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानकडून यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यात आली. प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, राज्यात या प्रकरणावरुन राजकारण सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आम्हाला आणि तमान शिवप्रेमींना दु:ख झाले. जोपर्यंत शासन या ठिकाणी नवीन पुतळा बसवत नाही, तोपर्यंत आपण या ठिकाणी एखादा पुतळा बसवला पाहिजे, हे आमच्या मनात आले. त्यामुळे हा पुतळा घेऊन आम्ही आलो होतो. सध्या आम्ही आणलेला पुतळा राजकोट किल्ल्यावर बसवा. जेव्हा नवीन पुतळा बसवणार तेव्हा आम्ही हा पुतळा परत घेऊन जाऊ, अशी भूमिका आम्ही सांगितली. परंतु प्रशासनाने त्यास नकार दिला.

हे सुद्धा वाचा

संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

दरम्यान, पुतळ्याची निर्मिती करणारे शिल्पकार जयदीप आपटे सध्या फरार आहे. त्यांच्या घरावर संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलन केले. त्यांच्या घरावरती अंडी मारत, शिवद्रोही असे पोस्टर चिपकवत, दरवाजावर लाथा मारत संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन करण्यात आले.

'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण
नागपूरच्या 'या' चहावाल्याची फडणवीसांकडून दखल, शपधविधीचं विशेष निमंत्रण.
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?
'...तोपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल', 'मातोश्री'वर ठाकरे काय म्हणाले?.
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?
बाळ्यामामा म्हात्रे शरद पवारांची साथ सोडणार? फडणवीसांची का घेतली भेट?.
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले...
एकनाथ शिंदे ज्युपिटर रूग्णालयातून बाहेर येताच एकच वाक्य म्हणाले....
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?
छगन भुजबळांना मोठं मंत्रिपद मिळणार? 'त्या' कोटवरून का होतेय चर्चा?.
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?
एकनाथ शिंदे ठाण्यातील ज्युपिटर रूग्णालयात दाखल, नेमकं झालं काय?.
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट
मारकडवाडी फेरमतदानाबाबत राम सातपुतेंकडून ऑडिओ क्लिप ट्विट.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच.
तुम्ही कोल्डड्रिंक्स पितात? सिगारेट-तंबाखूचंही व्यसन आहे? मग हे वाचाच..
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?
शिंदे विरोधी पक्षनेते? भाजपचं षडयंत्र... अंजली दमानिया काय म्हणाल्या?.