शिवसेना का सोडली…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले कारण
shivsena adhiveshan kolhapur | आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम ३७० हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारले नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही.
कोल्हापूर, दि. 17 फेब्रुवारी 2024 | महाविकास आघाडीत असताना बाळासाहेबांचे विचार मरु लागले होते. शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ लागले होते. नेतृत्व चुकत असल्याचे लक्षात आले होते. मग बाळासाहेबांची भूमिका मांडण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले. आमचे पाऊल जर चुकले असते तर ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष जनतेने केला नसता. तुम्ही देखील इतक्या मोठ्या संख्येने येथे आला नसता, असे शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी शिवसेनेच्या अधिवेशनात बोलताना सांगितले. यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घाणाघात मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
बाळासाहेबांनी मोदींचे कौतूक केले असते
आज बाळासाहेब असते तर राम मंदिर पूर्ण होताना आणि कलम ३७० हटवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतूक केले असते. परंतु जे वारसा सांगता आहेत, त्यांनी एकही शब्दही उच्चारला नाही. यामुळे हिंदुत्व सांगण्याची तुमच्याकडे नैतिकता नाही. तुमच्याकडे असतो तो पर्यंत तो व्यक्ती चांगला असतो. परंतु गेल्यावर तो कचरा होतो. तो गद्दर होतो. आता एकेदिवशी हा महाराष्ट्र तुम्हाला कचरा केल्याशिवाय राहणार नाही, अशा घाणाघात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केला. आज त्यांनी आत्मपरीक्षण, आत्मचिंतन करायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला.
…मग लोकांचे हे प्रेम मिळाले नसते
आम्ही अनेक ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी रात्रीअपरात्री हजारो लोक स्वागतासाठी येतात. लोकांचे हे प्रेम कामातून, वागण्यातून मिळाले आहे. आम्ही चुकीचे केले असते तर लोकांचे हे प्रेम मिळाले असते. बाळासाहेबांनी सांगितले होते काँग्रेससोबत जाण्यापेक्षा माझे दुकान बंद करेल. मग आज त्याच काँग्रेससोबत तुम्ही बसला आहात. आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले? सावरकरांचा अपमान केला तेव्हा कुठे गेले तुमचे हिंदुत्व? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.
आता तुमचे हिंदुत्व कुठे गेले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात करताना लवकरच आपण सर्वांना अयोध्येत घेऊन जाणार असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेचे अधिवेशन कालपासून सुरु आहे. अनेक विषयांना या अधिवेशनातून चालना देण्यात आली. कोल्हापूर शहरात भगवे वातावरण झाले आहे. शिवसेना ही कुणाची आहे, हे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी उद्योजकांसाठी सर्व ठराव आपण करुन घेतले.
आरसा त्यांनी स्वतःला पहावे. स्वतःचे कर्तुत्व आरशात पहावे. किती मुकुटे घालून फिरणार तुम्ही? हे कधी लपत नाहीत. या गोष्टी सगळ्या बाहेर येत असतात. बाळासाहेबांचा वारसा सांगण्यासाठी तोंडात नाही तर मनगटात जोर असावा लागतो. ताकत असावी लागते. ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी केले. पाकिस्तानची मॅच होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियम तोडून टाकलं ही शिवसेना कार्यकर्ते होते.शिवसेना अशीच मोठी झाली नाही. त्यासाठी रक्ताचे पाणी केले लोकांनी. घरावर तुळशीपत्र ठेवले.