जलयुक्त शिवार योजनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाला डिवचलं, म्हणाले अडीच वर्षे…

महाविकास आघाडीला टोला लगावत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जलयुक्त शिवार योजनेवरुन देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

जलयुक्त शिवार योजनेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाला डिवचलं, म्हणाले अडीच वर्षे...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 11:50 AM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी टीव्ही 9 मराठीच्या ( TV 9 Marathi ) व्यासपीठावरून महासंकल्प ( Mahasankalp ) मांडत असतांना शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची असणारी जलयुक्त शिवार योजनेबद्दल भाष्य केलं आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांच्या सरकारने घेतलेल्या जलयुक्त शिवार ( Jalyukt Shiwar ) योजनेचं कौतुक केलं आहे. यावेळी मात्र महाविकास आघाडी सरकारने ती योजना रद्द केल्याचे सांगत आम्ही ती पुन्हा सुरू केल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. शेती हा शास्वत विकास झाला पाहिजे. पीक पद्धतीत बदल झाला पाहिजे. पारंपरिक शेती बरोबर सेंद्रिय शेतीवर काम केलं पाहिजे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

केंद्र सरकारने बजेटमध्ये सेंद्रिय शेतीसाठी तरतूद केली आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीला सुद्धा आम्ही मदत करणार आहोत, सेंद्रिय शेतीला लागणाऱ्या पाण्याचा मुद्दा सुद्धा आम्ही निकाली लावणार आहोत.

यामध्ये 18 ते 20 असे प्रकल्प होते ते आम्ही सुरुवातीला तीन-चार महिन्यात हाती घेतले आहे. सिंचन प्रकल्पाला मंजूरी देऊन अडीच ते पाच लाख हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. त्यामुळे शेतीला मोठी मदत होईल.

हे सुद्धा वाचा

जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली. पावसाचे पडणारे पाणी एक एक थेंब झिरपले पाहिजे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना ही जलयुक्त शिवार योजना सुरू झाली होती, तीचा आदर्श इतर राज्यांनी घेतला.

पण मागील सरकारने ती योजना बंद करून टाकली होती, ती आम्ही पुन्हा सुरू केली आहे. प्रभावीपणे आम्ही ती योजना राबवत आहे. पावसाचे जे पाणी आहे ते दुष्काळी भागात कसे वळविता येईल त्याचे काम आम्ही हात घेतले आहे.

शेतकऱ्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे, सामूहिक शेती केली पाहिजे त्यासाठी आम्ही काही योजना आणणार आहोत, त्याचे ब्रँडिग आणि मार्केटिंगसाठी सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी टीव्ही 9 मराठीच्या महाराष्ट्राच्या महासंकल्पमध्ये कृषी विषयावर भाष्य करत शेतकऱ्यांना मदत करणार आहोत आणि यापुढे काय योजना आहेत याचा संकल्प मांडला आहे.

याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत असतांना महाविकास आघाडीला चांगलाच टोला लगावला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.