AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अपघाताच्या घटना घडू नये यासाठी सरकारचा प्लॅन काय ? मुख्यमंत्र्यांनी सांगितले…

यवतमाळहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसचा नाशिक येथे अपघात झाला त्याची सखोल चौकशी केली जाणार असून चौकशी अंती दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

अपघाताच्या घटना घडू नये यासाठी सरकारचा प्लॅन काय ? मुख्यमंत्र्यांनी सांगितले...
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Oct 08, 2022 | 3:41 PM

चंदन पूजाधिकारी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : अपघात होणारे ब्लॅकस्पॉट (Black Spot) शोधून काढणार आणि तातडीने उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिले आहे. नाशिकमधील औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेल चौफुली येथे पहाटेच्या सुमारास खाजगी बस आणि टँकरचा अपघात झाला होता. त्यात आत्तापर्यन्त 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यात 31 जण जखमी असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. याच ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून तातडीची बैठक देखील घेतली आहे. त्यामध्ये रुग्णांना राज्य सरकारने पाच लाखांची मदत जाहीर केली असून उपचार सरकार करणार असल्याची माहिती दिली आहे. तर केंद्र सरकारकडून देखील 2 लाखांची मदत जाहीर झाल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.

यवतमाळहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसचा नाशिक येथे अपघात झाला त्याची सखोल चौकशी केली जाणार असून चौकशी अंती दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी शासनाने दखल घेतली असून त्याबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

संपूर्ण नाशिकमध्ये “ब्लॅक स्पॉट” शोधून जिथे उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती देखील शिंदे यांनी दिली आहे.

सर्व विभागांची बैठक एयरपोर्टवर घेतली असून लवकरच अपघातांच्या स्थळांबाबत उच्चस्तरीय बैठक तातडीने घेतली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नाशिक शहरामध्ये दिवसाला तरी एक अपघात निश्चित असतो, त्यामुळे अपघात रोखण्यासाठी सरकार प्लॅन आखणार असून अपघात कसे रोखणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.