‘मविआ’काळात तिसरा क्रमांक, आता पहिला नंबर, पण ते प्रसिद्धी करताय गुजरातची… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

mahayuti press conference: लाडकी बहीण योजनेसाठी आमचे टार्गेट २ कोटी ५० लाख होते. आता २ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात पैसे गेले. नोव्हेंबर महिन्यात आचरसंहिता लागणार आहे, हे माहीत होते. त्यामुळे ते पैसे ऑक्टोंबर महिन्यात देऊन टाकले, असे एकनाथ शिंदे यांनी केला.

'मविआ'काळात तिसरा क्रमांक, आता पहिला नंबर, पण ते प्रसिद्धी करताय गुजरातची... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला
Follow us
| Updated on: Oct 16, 2024 | 2:45 PM

mahayuti press conference: पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात महाराष्ट्र सरकारने मोठी कामे केली आहेत. महाविकास आघाडीच्या काळात गुंतवणुकीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर होते. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणली आहे. ते करार पूर्ण होत आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भाग आणि आदिवासी भागात गुंतवणूक पोहचली आहे. उद्योजकांसाठी आम्ही रेड कार्पेट आखले आहे. महाराष्ट्रात सेमी कंडक्टरचा प्रकल्प आला आहे. उद्योजकांना हव्या त्या सुविधा देत आहोत. परंतु ती लोक गुजरातची प्रसिद्धी करत आहेत. कर्नाटकची प्रसिद्ध करत आहेत. आम्ही सर्व आकडेवारी समोर ठेवली आहे. महाराष्ट्रच गुंतवणुकीबाबत पहिल्या क्रमांकावर आहे. ही लोक राज्याची बदनामी करत आहेत. त्यांनी विरोध करावा, पण विरोधाला विरोध नको, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

लाडकी बहिणींचे टार्गेट पूर्ण

महायुतीकडून बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मविआवर जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी आमचे टार्गेट २ कोटी ५० लाख होते. आता २ कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात पैसे गेले. नोव्हेंबर महिन्यात आचरसंहिता लागणार आहे, हे माहीत होते. त्यामुळे ते पैसे ऑक्टोंबर महिन्यात देऊन टाकले, असे एकनाथ शिंदे यांनी केला.

दोन वर्षांत आम्ही ९०० निर्णय घेतले

शासन आपल्या दारी योजनेतून पाच कोटी लोकांना लाभ मिळाले. महायुती सरकारने दोन अडीच वर्षांत जे कामे केली आहे, ते समोर ठेवले आहे. दुष्काळग्रस्त भागात पाणी पोहचवण्याच्या योजना आम्ही आणल्या आहे. १४५ सिंचन योजना आम्ही आणल्या आहेत. दोन अडीच वर्षांत आम्ही ९०० निर्णय घेतले आहे.

हे सुद्धा वाचा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, विरोधी पक्ष लाडकी बहिणीवर टीका करतो. मुलींना मोफत शिक्षण देणार कुठलं सांगत आहे. सरकारकडे पैसे नाही. पण त्यांचे नेते म्हणतात, आमचं सरकार आलं की आम्ही २ हजार रुपये देऊ. मग विरोधकांनी ठरवलं पाहिजे सरकारकडे आहे की नाही. आम्ही काही योजना सांगितल्या आहेत. आणखी योजना जाहीरनाम्यात देणार आहोत. विरोधक कन्फ्यूज आहेत. सरकारकडे पैसे नाही म्हणतात आणि नवनवीन योजना विरोधक सुरू करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.