AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन महिन्यांपूर्वी आम्ही पर्यटन करून आलो, त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना देऊ – मुख्यमंत्री

राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आपल्याला करायचे आहे, त्यासाठी दुर्ग प्राधिकरण आपण लवकरच सुरू करणार असल्याचे म्हंटले आहे.

तीन महिन्यांपूर्वी आम्ही पर्यटन करून आलो, त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाला चालना देऊ - मुख्यमंत्री
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 10:46 PM

नाशिक : तीन महिन्यांपूर्वी आम्ही मोठे पर्यटन करून आलो आहेत, त्यामुळे नाशिकच्या पर्यटनाला (Nashik tourism) चालना देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नाशिकमध्ये म्हंटले आहे. नाशिकमध्ये स्थानिक वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे विधान केले आहे. मुख्यमंत्री यांनी हे विधान करताच सभागृहात एकच हशा पिकला होता. दरम्यान, कार्यक्रमाला उपस्थित असलेले संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिकला राज्यातील सर्वाधिक किल्ले आहेत, त्याचे जतन संवर्धन व्हायला हवे, ती आपली खरी संपत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात कसे गड किल्ले उभे केले असतील? हे गडकिल्ले जपण्याचे काम आपल्याला करायचं आहे असे संभाजीराजे म्हणाले होते, त्याच मुद्द्याला धरून बोलत असतांना मुख्यमंत्री यांनी तीन महिन्यापूर्वी केलेल्या पर्यटनाची आठवण काढत गड किल्ले संवर्धनाबाबत महत्वाची भूमिका घेतली आहे.

राज्यातील अनेक तरुण हे मला येऊन भेटत असतात, गड किल्ल्यांच्या संदर्भात आम्हाला काम करायचे आहे असे सांगत असतात, लोकांमध्ये मोठा उत्साह असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे.

याशिवाय राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आपल्याला करायचे आहे, त्यासाठी दुर्ग प्राधिकरण आपण लवकरच सुरू करणार असल्याचे म्हंटले आहे.

हे सुद्धा वाचा

रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडचे काम संभाजीराजे यांनी चांगले काम केले आहे, गड किल्ल्यांचे संवर्धन हा महत्वाचा विषय घेऊन ते काम करत आहे असल्याचे देखील म्हंटले आहे.

मुंबई आणि पुणे या शहराला लागून असलेले हे मोठे आणि ऐतिहासिक शहर असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे. त्यात कुंभमेळा होत असल्याने त्याची तयारी देखील आपण करत असल्याचे शिंदे यांनी म्हंटले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून कामे संत गतीने होत होती, मात्र आता ती आपल्याला गती देऊन करायची आहे, त्यात नाशिकचा विकास आपल्याला करायचा असून त्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?
नाक दाबलं की तोंड उघडतं.,'सिंधू जल' स्थगितीवर काय म्हणाले अण्णा हजारे?.
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला
1 हजार भारतीय नागरिक मायदेशी परतले, 800 पाकिस्तान्यांनी भारत सोडला.
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी
बदलापूर रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी! प्रवाशांचा संताप अन् एकच मागणी.
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं
पहलगाम हल्ल्यातल्या 'त्या' झिपलाइन ऑपरेटरला एनआयएने ताब्यात घेतलं.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना लष्कराने घेरलं; सुत्रांची माहिती.
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग
पर्यटकांच्या हत्येचा बदला कोणत्याही क्षणी? देशात हालचालींना वेग.
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
पहलगाम हल्ल्यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक.
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार
पाकिस्तान सुधरेना! कुरघोड्या सुरूच, सलग पाचव्या दिवशी गोळीबार.
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.