मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितला पुढील राजकीय प्रवास, 11 महिन्यात एवढं तर मग पुढील काळात किती…
मागील अडीच वर्षात जे स्पीड ब्रेकर केले होते ते सर्व आम्ही तोडून काढले आहे. 2 हजार 213 कोटी रुपये आपण लोकांना देतोय. 567 कोटी मान्य केले. पैंगगंगा नदीवर 7 बंधारे मंजूर केले. सरकार आल्यापासून आम्ही 29 सुप्रमा देत एकूण 18 हजार कोटी सुप्रमा दिल्या.
नांदेड : मी आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेतली आज 35 ते 40 मंत्री झालेत. सर्व कॅबिनेटचे निर्णय हे सर्वसामान्य लोकांसाठी घेतले. स्वतःच्या स्वार्थासाठी निर्णय घेतले नाहीत. सरकार येतात, जातात पण लोकांसाठी जे काम करतात तेच सरकार लोकांच्या लक्षात राहते. आम्ही 75 हजार लोकांनी शासकीय नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला.आरक्षणामध्ये साडेतीन हजार पदे थांबली होती त्याचे वाटप आम्ही केले. विरोधकांनी टीका केली की ही जाहिरातबाजी सुरू आहे. पण जे टीका करणारे होते तेच आज सरकार आपल्या दारी असे बोर्ड लावत आहेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
नांदेड येथे ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा आज विक्रम झालाय. महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले त्याचे स्वागत करूया. शेतकरी आपला अन्नदाता आहे. हे सरकार शेतकरी आणि कामगारांचे आहे आणि मी शेतकऱ्याचा मुलगा आहे हे अभिमानाने सांगतो असे ते म्हणाले.
शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचले आहेत. आम्ही सर्व नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना 10 हजार कोटीचे वाटप केले. नियमित कर्ज फेडणाऱ्यांना इन्सेन्टिव्ह रक्कम दिली. पीक विमा रक्कमही देतोय. मी आणि फडणवीस यांनी शपथ घेतलो. आज 35 ते 40 मंत्री झाले. सर्व कॅबिनेटचे निर्णय हे सर्वसामान्य लोकांसाठी घेतले. स्वतःच्या स्वार्थासाठी कोणतेही निर्णय घेतले नाहीत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
हे आमचे काम आहे.
समृद्धी महामार्ग आम्ही नांदेड पर्यंत वाढवतो आहे. कृषी महाविद्यालय पाहिजे अशी मागणी आली त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. काम करणे हे आमचे काम आहे. त्याच कामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना धडकी भरली आहे. त्यामुळेच ते आरोप करत आहेत. मात्र, त्यांच्या आरोपांना एकनाथ शिंदे उत्तर हे कामातून देईल असे ते म्हणाले.
11 महिन्यात एवढं तर…
खुर्ची आज असेल उद्या नसेल पण, मी काल कार्यकर्ता म्हणून काम केले, आजही करतोय आणि उद्याही करेन. बाळासाहेब सांगायचे, नोकरी घेण्यापेक्षा नोकरी देणारे हात बनवा. त्यांनी जे जे सांगितले ते ते आम्ही केले. 11 महिन्यात एवढं तर मग पुढील काळात आमचे काम कसे असेल याची धडकी भरल्यामुळेच आपल्यावर आरोप करत आहेत. आपण आपले काम करू. त्यांना कुठे पाटण्यात, चटण्यात बैठक कार्याच्या असतील त्या करू द्या, अशी टीकाही त्याम्नी विरोधी पक्षाच्या पाटणा येथे झालेल्या बैठकीवर केली.