मी विनंती करतो की… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनोज जरांगे यांना आवाहन काय?

maratha reservation issue | जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवले पाहिजे. आंदोलनाचा जनतेला त्रास होत आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम अनेक पातळ्यांवर एकाच वेळी सुरु आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

मी विनंती करतो की... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मनोज जरांगे यांना आवाहन काय?
Follow us
| Updated on: Jan 21, 2024 | 1:12 PM

मुंबई, दि.21 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी अंतरवली सराटीवरुन मुंबईकडे येण्यास निघाले आहे. पाच दिवसांच्या प्रवासानंतर ते मुंबईत २६ जानेवारी रोजी पोहचणार आहे. मुंबईत पोहचल्यावर आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार आहे. त्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवले पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम अनेक पातळ्यांवर एकाच वेळी सुरु आहे. यामुळे ओबीसी आरक्षणास धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात ज्या त्रुटी सांगितल्या होत्या, त्या दूर करण्याचे काम सुरु केले आहे. त्यासाठी यंत्रणा काम करत आहेत. त्या त्रुटी दूर केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाकडूनही मराठा समाजाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. राज्यात कुणबी नोंदी मिळत आहे. त्यानंतर प्रमाणपत्र देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांच्या सूचनाप्रमाणे लाखो लोकांना प्रमाणपत्रे दिली जात आहे. कुणबी नोंदणी सापडलेल्या प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यभरात यंत्रणा कामाला लागली आहे. विशेष शिबीर घेऊन प्रमाणपत्र दिले जात आहे. तेलंगणात कागदपत्रे तपासले जात आहे. उर्दू, फारशी भाषेतील कागदपत्रांचे भाषांतर केले जात आहे.

जनतेला त्रास होईल…

जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवले पाहिजे. त्यांनी सुरु केलेले आंदोलन टाळले पाहिजे. आंदोलनाचा जनतेला त्रास होत आहे. आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात शनिवारी बैठक घेतली. या बैठकीला सर्व अधिकारी होते. गोखले इन्सट्यूटचे प्रतिनिधी होते. मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

मागासवर्गीय आयोगाच्या रिपोर्ट येणार आहे. त्यांचे सर्वेक्षणाचे काम सुरु होत आहे. त्यासाठी सर्व नियोजन केले गेले आहे. मराठा आरक्षणासाठी एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर काम होत आहे. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवले पाहिजे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.