AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंनी किती जणांची मनं सांभाळायची..? ; त्यामुळे सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांना समजून घ्या; जयंत पाटलांचा शिंदेंना टोला

सांगलीः मंत्र्यांना खाते वाटप करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो. मात्र एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी किती जणांची मनं सांभाळायची आता. शिंदेनी किती जणांना सांभाळायचं, त्यामुळे आता सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदे यांना समजून घेणं गरजेचे असल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil) यांनी केली. सांगलीमध्ये जयंत पाटील हे प्रसारमाध्यमांशी […]

एकनाथ शिंदेंनी किती जणांची मनं सांभाळायची..? ; त्यामुळे सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांना समजून घ्या; जयंत पाटलांचा शिंदेंना टोला
Follow us
| Updated on: Aug 14, 2022 | 11:32 PM

सांगलीः मंत्र्यांना खाते वाटप करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असतो. मात्र एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी किती जणांची मनं सांभाळायची आता. शिंदेनी किती जणांना सांभाळायचं, त्यामुळे आता सगळ्यांनी मिळून एकनाथ शिंदे यांना समजून घेणं गरजेचे असल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP state president Jayant Patil) यांनी केली. सांगलीमध्ये जयंत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शिंदे-फडणवीस सरकारच्या खातेवाटपाची जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे. महत्वाची आणि अतिमहत्त्वाच्या खातेवाटपावरुन (Cabinet expansion) जोरदार गदारोळ सुरू झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रदेशाध्य जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते, आता मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे तर त्यावरून शिंदे-फडणवीस यांना लक्ष्य करून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येऊ लागली आहे. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी, खात्यावरून आता नाराजी नाट्य सुरू होणार का असच चित्र तयार झालं आहे.

स्वातंत्र्य दिनादिवशी खातेवाटप

एक समाधानकारक गोष्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनादिवशी खातेवाटप असणारे मंत्री झेंडावंदन करतील. महाराष्ट्रातील समस्या सोडवण्यासाठी खात्यासहित मंत्री महाराष्ट्राला आता मिळाले आहेत. त्याबद्दल सरकारचं मी अभिनंदन करतो असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

विनायक मेटेंचे निधन दुर्दैवी घटना

महाराष्ट्रातील सगळ्या प्रश्नांची जाण असणारा, चळवळीतील नेता आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत नेहमी आग्रही भूमिका घेणारे विनायक मेटे यांच्या बाबतीत आज दुर्दैवी घटना घडली आहे. भीषण अपघात होता मात्र त्यांना अपघात झाल्यानंतर रस्त्यावर वेळेवर मदत मिळाली नसल्याचे जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

खातेवाटपाबद्दल टिप्पणी

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावताना खातेवाटपाबद्दल टिप्पणी केली. आता ज्या आमदारांनी शिवसेनेतून मंत्री पदासाठी बंडखोरी केली त्यांना सगळ्यानाच मंत्रिपद मिळेल अशी आशा दाखवण्यात आली होती, मात्र आता महत्वाची आणि अतिमहत्त्वाची खात्यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागल्याने जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनाच आता इतरांनी समजून घेतलं पाहिजे असा टोला लगावला आहे.

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.