एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची मोठी आणि अधिकृत घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...!
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 11:37 AM

उस्मानाबाद : गेली साडेतीन दशकं भाजपला वाढवणारे आणि भाजपला बळ वाढवणारे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून येत्या शुक्रवारी दुपारी 2 वाजता ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची मोठी आणि अधिकृत घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Chief Minister Uddhav Thackeray welcomes Eknath Khadse entry into NCP)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज उस्मानाबादच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी खडसे यांनी भाजप पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून ते आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, ‘ही खूप आनंदाची बातमी आहे. खडसेंचं महाविकास आघाडीच्या कुटुंबामध्ये स्वागत आहे’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

“डेंजरपणे हिशेब चुकते करण्याची खडसेंची ख्याती, गिरीश महाजनांना थेट आव्हान”

शुक्रवारी दुपारी एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे या सुद्धा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, खडसे यांच्या स्नुषा आणि भाजपच्या खासदार रक्षा खडसे या मात्र भाजपमध्येच राहणार असून हा खडसे यांच्या राजकीय खेळीचा भाग असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (Chief Minister Uddhav Thackeray welcomes Eknath Khadse entry into NCP)

भाजपसाठी 40 वर्षे योगदान दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. जळगावमधील खडसे समर्थकांनी जळगाव महापालिका बरखास्त करण्याचं पत्रं महापालिका आयुक्तांना दिल्यानंतर तेव्हाच खडसे भाजपमधून बाहेर पडणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यातच खडसे समर्थकांनी जळगावमधील पोस्टरवरून कमळाचं चिन्हं गायब केल्याने तर त्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. परवा शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका, परवडत नसेल तर लसूण, मुळा खा : बच्चू कडू

एकनाथ खडसे यांना कृषी, जलसंपदा किंवा गृहनिर्माण? राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर खडसेंची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. दरम्यान, गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे. आव्हाड आणि पाटील हे दोघेही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. अशावेळी त्यांच्याकडून मोठ्या खात्याची जबाबदारी काढून ती भाजपमधून येणाऱ्या खडसेंना दिली जाणार का? असा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जात आहे.

(Chief Minister Uddhav Thackeray welcomes Eknath Khadse entry into NCP)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.