चीनमध्ये 133 प्रवाशांनी भरलेलं Boeing 737 विमान Crash, Guangxi भागातली दुर्घटना
चीनमध्ये (China) एक मोठा विमान अपघात झाला आहे. चीनचं बोइंग 737 विमान क्रॅश (Boeing737 crash ) होऊन कोसळलं. यानंतर जंगलात विमान जळून खाक झाल्याची माहिती आहे. 133 प्रवासी त्या विमानातून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे.
चीनमध्ये (China) एक मोठा विमान अपघात झाला आहे. चीनचं बोइंग 737 विमान क्रॅश (Boeing 737 crash ) होऊन कोसळलं. यानंतर जंगलात विमान जळून खाक झाल्याची माहिती आहे. 133 प्रवासी त्या विमानातून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. किती जण दगावले आणि किती वाचले आहेत यासंदर्भात माहिती समोर आलेली नाही. विमान गुआंगशी या प्रांतात जंगलात कोसळलं. विमान कोसळल्यानंतर जळून खाक झाल्याची माहिती आहे. विमानातून प्रवास करणारे 133 प्रवासी दगावल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. रायटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार चीनचं बोइंग 737 हे विमान Kunming येथून Guangzhouकडे जात होतं. हे विमान Guangxi या भागात कोसळलं आहे. यानंतर विमानानं पेट घेतला. विमान कोसळल्यानंतर पेट घेतल्यानंतर जंगल देखील पेटल्याचं समोर आलं आहे.

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य

दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?

VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर

भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
