Chiplun Flood : पूरग्रस्त भागातील मोठ्या रुग्णालयात रुग्णांसाठी बेड राखीव ठेवणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

आरोग्य विभागाच्या दृष्टीनं पुराच्या तडाख्यात सापडलेल्या गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करुन ठेवण्यात आला आहे. त्यासोबत आरोग्यविषयक सर्व साहित्य, औषधांची कुमक पाठवण्यात आली आहे.

Chiplun Flood : पूरग्रस्त भागातील मोठ्या रुग्णालयात रुग्णांसाठी बेड राखीव ठेवणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा
राजेश टोपे, आरोग्यमंत्री
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 10:14 PM

पुणे : महाराष्ट्रात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस कोसळतोय. चिपळूणमध्ये तर पावसानं हाहा:कार माजला आहे. चिपळूणची बाजारपेठ, एसटी स्टॅन्ड आणि घरंही पाण्यात बुडाली होती. आज चिपळूणमधील पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे. असं असलं तरी अजून दोन दिवस कोकणात पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. दरम्यान, पूरस्थिती कमी झाली असली तरी आता मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. (Beds will be reserved for patients in large hospitals in flood-hit areas – Rajesh Tope)

राज्यातील पूरस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. नागरिकांना लागणारी सर्व मदत राज्य सरकारकडून केली जाईल. आरोग्य विभागाच्या दृष्टीनं पुराच्या तडाख्यात सापडलेल्या गावात एक डॉक्टर आणि नर्सेस यांचा गट तयार करुन ठेवण्यात आला आहे. त्यासोबत आरोग्यविषयक सर्व साहित्य, औषधांची कुमक पाठवण्यात आली आहे. त्याचबरोबर मोठ्या रुग्णालयात रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवण्यात येत आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिलीय. ते आज पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये बोलत होते.

कोल्हापुरात पूरस्थिती, पंचगंगेची पाणीपातळी 53 फुटांवर

राज्यात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांसह आता कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर बनली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 53 फुटांवर पोहोचली आहे. त्यामुळे आंबेवाडी आणि चिखली ही दोन गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. या गावातील घरांमध्ये दुसऱ्या मजल्यापर्यंत पाही शिरलं आहे. त्यामुळे घरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यांना घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी नेण्यात येत आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळी 53 फुटांवर गेल्यामुळे आंबेवाडी आणि चिखली ही दोन्ही गावं पाण्यात बुडाली आहेत. 2019 च्या महापुरातही ही गावं पाण्यात बुडाली होती. त्यामुळे सावधगिरी म्हणून नागरिकांना घरातून बाहेर पडण्याचं आवाहन रेस्क्यू टीमकडून करण्यात येत आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुणे-बंगळुरु महामार्गावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसंच कोल्हापूर शहरातून महामार्गाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात झाले आहेत. नदीच्या पाणीपातळीत अशीच वाढ होत राहिली तर परिस्थिती गंभीर बनू शकते. त्यामुळे नागरिकांनी वेळीच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं जात आहे.

संबंधित बातम्या :

साताऱ्यावर दु:खाचा डोंगर, तब्बल सहा ठिकाणी दरडी कोसळल्या, अनेक संसार उद्ध्वस्त, कुठे किती मृत्यू?

Sangli Flood : कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती; जलसंपदामंत्री सांगलीत दाखल, अधिकारी आणि नागरिकांच्या सातत्याने संपर्कात

Beds will be reserved for patients in large hospitals in flood-hit areas – Rajesh Tope

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.