‘आम्ही गुळ-खोबरं देवून…’, चित्रा वाघ भर पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाल्या?

"मला अशा 56 नोटीस रोज येत असतात. त्यात आणखी एकीची भर पडली", असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटीसला दिलं.

'आम्ही गुळ-खोबरं देवून...', चित्रा वाघ भर पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाल्या?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 4:43 PM

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली रोखठोक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली. “एक मुलगी जी मुंबईच्या रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी, ज्या पद्धतीने नंगानाच तिचा चालूय, तो बंद व्हावा यासाठी आम्ही उठवलेला आवाज , त्यासाठी आम्ही पोलीस आयुक्तांकडे गेलो, आमची भूमिका मांडली. आम्ही गुळ-खोबरं देवून कुणाला आमंत्रण द्यायला गेलो नव्हतो. पण यामध्ये उड्या आल्याच. मग उड्या आल्यानंतर प्रश्न आलेच. ते प्रश्न आल्यानंतर त्या प्रश्नांचं उत्तर देणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी मी तुमच्यासमोर आले”, असं म्हणत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली.

“रुपाली चाकणकर यांनी महिलांचा आदर आणि सन्मान राखण्यासाठी महिला आयोग स्थापन झालंय याचा उल्लेख केला याचा आनंद वाटला. पण समाधान तेव्हा वाटेल जेव्हा खऱ्या अर्थाने महिलांना त्याठिकाणी दिलासा मिळेल आणि आम्ही त्यावेळेला नक्कीच सादर करेन”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

“आता संदर्भ दोन वेगवेगळ्या प्रकारणांचा कसा काय? कारण दोन्ही प्रकरणांमध्ये महिलाच आहेत. अंगप्रदर्शनावर आक्षेप आहेत. मग एकीला जाब विचारायचा आणि दुसरीला गोंजरायचं. हे कसंकाय? त्यामुळे एका प्रकरणात दोन वेगवेगळे संदर्भ असूच शकत नाहीत”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

“मला एक नक्की सांगायचं आहे. आक्षेप हा या संस्थेला नाहीच. माझा आक्षेप आहे की, ज्या पद्धतीने या प्रकरणात जी अंमलबजावणी केली गेली त्या संस्थेच्या अध्यक्षांच्या कार्यप्रणालीवर आक्षेप आहे. त्या कार्यपद्धतीमुळे न्यायाची परिभाषा कोणती? हा प्रश्न उपस्थित होतोय. तिथे काय करतात याची माहिती मला आहे”, असंदेखील वाघ म्हणाल्या.

“ज्या पद्धतीने आयोगावर आक्षेप असं बोललं जातंय. अरे पण तुम्ही म्हणजे आयोग नाही. एकटी अध्यक्ष म्हणजे आयोग नसते. आयोग म्हणजे अध्यक्ष आणि त्यासोबत असणारे सदस्य, तसेच महाराष्ट्र पोलीस महासंचालक हे सुद्धा या आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. एकटी मी म्हणजे आयोग असं डोक्यात असेल तर ते काढायला पाहिजे”, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी सुनावलं.

“मला अशा 56 नोटीस रोज येत असतात. त्यात आणखी एकीची भर पडली”, असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटीसला दिलं.

“मला जी नोटीस पाठवली आहे, ती सगळ्या सदस्यांच्या बहुमताने मंजूर करुन पाठवली आहे का? आयोगाचे जे पद्सिद्ध सदस्य आहेत, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांची संमती घेतलीय का? तुम्ही म्हणजे आयोग नव्हे. माहिती घ्या. सदस्य, पोलीस महासंचालक हे मिळून आयोग होतो”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

“मुंबई पोलीस आयुक्तांनी दखल घेतली नाही हेही सांगितलं गेलं. कशाच्या आधारावर? जे वक्तव्य केलं गेलं की, मुंबई पोलीस आयुक्तांनीदेखील दखल घेतली नाही ते कशाच्या अधिकारावर बोलले? खुलासा मागवला का? म्हणजे आयोगाच्या अध्यक्षांना खुलासा करण्याचा अधिकार आहे. मागवला असेल तर स्पष्ट करा. फोनवर बोलणं झालं तर स्पष्ट करा”, असं आवाहन वाघ यांनी केला.

“एवढ्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदी बसल्यावर ही असली बाष्कळ विधानं, तुमची तर घालवतातच, ज्या पक्षातून आलात त्याचीही घालवतात. सर्वात महत्त्वाचं आम्हाला ते दोन्ही आम्हाला महत्त्वाची नाहीत. आम्हाला महत्त्वाचा आहे तो आयोग. बाष्कळ विधानं बंद केली पाहिजे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.