कोकण रेल्वे मार्गावर धावणार ख्रिसमस स्पेशल ट्रेन; प्रवाशांना मोठा दिलासा

ख्रिसमसचा उत्सव गोव्यात साजरा करण्याचा बेत आखणाऱ्या कोकणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून राजस्थानातील अजमेर ते गोव्यातील वास्को द गामा जंक्शन दरम्यान विशेष गाडी धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून जाताना ही गाडी खेड, चिपळून, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ तसेच सावंतवाडी स्थानकांवर स्टॉप घेणार आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणार ख्रिसमस स्पेशल ट्रेन; प्रवाशांना मोठा दिलासा
medical help in train
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 12:37 PM

मुंबई  : ख्रिसमसचा उत्सव गोव्यात साजरा करण्याचा बेत आखणाऱ्या कोकणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाकडून राजस्थानातील अजमेर ते गोव्यातील वास्को द गामा जंक्शन दरम्यान विशेष गाडी धावणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून जाताना ही गाडी खेड, चिपळून, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ तसेच सावंतवाडी स्थानकांवर स्टॉप घेणार आहे. कोरोना काळात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या, त्यामुळे ख्रिसमसला गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची ट्रेनमध्ये गर्दी होऊ शकते, प्रवाशांची गैरसोय टळावी यासाठी ही स्पेशल रेल्वे सुरू करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी सुटणार ट्रेन

नवी वर्षाचे स्वागत तसेच ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ही गाडी आठवड्यातून एकदा चालवण्यात येणार आहे. ( 09619-09620) ही गाडी अजमेर ते वास्को द गामा जंक्शन दरम्यान येत्या 25 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान धावणार आहे. ही ट्रेन शनिवारी सकाळी नऊ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजता गोव्यात पोहोचेल. साधारणपणे हा एक दिवस म्हणजेच 24 तासांचा प्रवास असणार आहे. ती अजमेरवरून येताना कोकण रेल्वे मार्गावर खेड, चिपळून, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ तसेच सावंतवाडी स्थानकांवर स्टॉप घेणार आहे.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

दरम्यान देशावरील कोरोनाचे सावट अद्यापही कमी झालेले नाही. कोरोना काळात अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या दोन वर्षांपासून घरीच असलेले नागरिक ख्रिसमस आणि नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने गोव्यात येऊ शकतात. रेल्वे गाड्यांना गर्दी वाढू शकते. गर्दी वाढल्यास कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. हे सर्व टाळून प्रवाशांना सुरक्षीत प्रवास करता यावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

धनंजय मुंडेंनी जगमित्र कारखाना लुटला, सोमय्यांचा आरोप; मृत शेतकऱ्यांच्या नावावर 83 कोटी लाटल्याचा दावा

MNS: राजसाहेब माझं काय चुकलं? पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही अस्वस्थता, कुणाची होतेय घुसमट?

पवार साहेबांना आशीर्वाद देतील असे ‛हात’ नाहीत; रूपाली पाटील म्हणाल्या वटवृक्षाच्या सावलीत महाविकास आघाडीत स्थिरावणार

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.