इंजेक्शनचा डोस घेऊन डॉक्टराने संपवले जीवन

| Updated on: Feb 14, 2023 | 5:34 PM

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहात मंगळवारी धक्कादायक घटना घडली. एका डॉक्टराने इंजेक्शनचा डोस घेऊन आयुष्य आपले संपवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

इंजेक्शनचा डोस घेऊन डॉक्टराने संपवले जीवन
Image Credit source: social media
Follow us on

संदीप शिंदे, प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूर येथील शासकीय रूग्णालयातील निवासी डॉक्टराने मंगळवारी दुपारी आत्महत्या केली. गौरव राजू वखारे (२५) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टराचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. ते भुलतज्ज्ञ विभागात कार्यरत होते. डॉक्टराने केलेल्या आत्महत्येमुळे कॉलेजच्या वसतीगृहात एकच खळबळ उडाली आली. सध्या घटनास्थळावर रूग्णालयातील डॉक्टरांनी मोठी गर्दी केली आहे. मयत गौरव हा बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी गौरव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहात मंगळवारी धक्कादायक घटना घडली. गौरव राजू वखारे या डॉक्टराने इंजेक्शनचा डोस घेऊन आयुष्य आपले संपवले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट पोलिसांना अद्याप सापडलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तसेच गौरव यांच्या नातेवाईकांनाही बोलवण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी प्राथमिक तक्रार नोंदवून घेतली आहे. अधिक तपास पोलिसांकडून केला जातो आहे.

का केली असेल आत्महत्या

आत्महत्या या घटनेमागे निराशा, अपयश ही कारणे असतात. परंतु गौरव उच्चशिक्षित होते. त्यांना कुठेही अपयश आलेले नाही. यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असले, अशी शक्यता आहे.

का येतो आत्महत्येचा विचार


एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येणं किंवा त्याने आत्महत्येची कल्पना करणं, याला मानसोपचारतज्ज्ञ ‘सुसाइट आयडिएशन’ म्हणतात.

लोक का करता आत्महत्या

  • डिप्रेशन किंवा नैराश्य
  • मानसिक स्थितीत चढ-उतार
  • सतत चिंता किंवा अस्वस्थता
  • ज्या गोष्टीत आनंद वाटत होता, आता त्या गोष्टीत रस नसणं
  • सतत मनात नकारात्मक विचार
  • भविष्याबद्दल निगेटिव्ह कल्पना

आकडे काय सांगतात?


आत्महत्या प्रतिबंधक धोरण तयार करण्यात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय तज्ञांव्यतिरिक्त मानसोपचार तज्ज्ञांचाही मोठा वाटा आहे. डॉ.सत्यकांत त्रिवेदी म्हणतात की, एका संशोधनानुसार, भारतात एकीकडे आत्महत्येच्या घटना वाढत आहेत, तर दुसरीकडे त्याच वेळेस इतर 200 लोक आत्महत्येच्या विचारात असतात. याच ट्रान्स मध्ये असताना त्या वेळी 15 जणांनी प्रयत्न केले आहेत. म्हणजेच, आत्महत्येची माहिती त्यांना थेट प्रेरणा देत आहे.