बीडच्या सरपंच हत्याकांडावर देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, SIT स्थापन करुन मारेकऱ्यांना….

"स्पेशल एसआयची स्थापन करुन या केस संदर्भात सर्व चौकशी आम्ही करणार आहोत. आरोपी कोणीही असो, कुठल्याच आरोपीला सोडलं जाणार नाही. अशाप्रकारच्या घटना या महाराष्ट्रात गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्याने घेतल्या जातील", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या घटनेवर दिली.

बीडच्या सरपंच हत्याकांडावर देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची प्रतिक्रिया, SIT स्थापन करुन मारेकऱ्यांना....
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 9:48 PM

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन विरोधकांकडून महायुती सरकारवर निशाणा साधला जातोय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी यासाठी मस्साजोगच्या गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं. सलग 11 तासांच्या रास्ता रोको आंदोलनानंतर पोलीस अधीक्षकांनी गावकऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या. तसेच पोलीस अधीक्षकांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली. या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. तसेच तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण चार आरोपी अद्यापही फरार आहेत.

या घटनेवरुन हिवाळी अधिवेशनात विरोधकांकडून सरकारला घेरलं जाण्याची शक्यता आहे. विरोधकांनी आज सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावरही बहिष्कार टाकला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार पडलेलल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी परभणी आणि बीडच्या घटनेवर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस बीडच्या घटनेवर काय म्हणाले?

“बीड जिल्ह्यात अतिश निर्घृणपणे सरपंचाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी काही लोकांवर कारवाई केली आहे. काहींना सस्पेंड केलं आहे तर काहींना घरी पाठवलं आहे. तीन आरोपी सापडले आहेत, चार आरोपींचा शोध सुरु आहे. ते लवकरच सापडतील. केस सीआयडीला तपासासाठी दिली आहे. स्पेशल एसआयची स्थापन करुन या केस संदर्भात सर्व चौकशी आम्ही करणार आहोत. आरोपी कोणीही असो, कुठल्याच आरोपीला सोडलं जाणार नाही. अशाप्रकारच्या घटना या महाराष्ट्रात गांभीर्यानेच घेतल्या जातात आणि गांभीर्याने घेतल्या जातील. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून सर्व धागेदोरे शोधून काढण्याचं काम हे निश्चितपणे करु”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस यांची परभणीतील घटनेवर प्रतिक्रिया

“परभणीच्या घटनेत, एका मनोरुग्णाने ज्याप्रकारे भारताच्या संविधानाचा अपमान केला त्या मनोरुग्णाला अटकदेखील करण्यात आली. दुर्दैवाने त्यानंतर एक उद्रेकदेखील झाला. मला या निमित्ताने विनंती करायची आहे की, अशाप्रकारे एखाद्या मनोरुग्णाच्या कृत्यावर असंविधानिक पद्धतीने कृत्य करणं हे योग्य नाही. हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कधीच मंजूर झालं नसतं. मात्र आता जी घटना घडली आहे ती घडून चुकली आहे. मी एवढंच सांगतो, हे सरकार संविधानाचा सर्वोच्च सन्मान करणारं सरकार आहे. कुठल्याही परिस्थिती तसूभरही संविधानापेक्षा वेगळं काम हे सरकार करणार नाही. आम्ही सर्वांनी संविधानाची जी शपथ घेतली त्या शपथेप्रमाणेच सरकार काम करेल. संविधानाचा गौरव करेल हा विश्वास मी देतो”, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.