सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं सत्य, म्हणाले…
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नेते आणि आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मोठ्या नेत्याबद्दल विधान केले आहे.
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेनंतर आता नुकतंच महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक नेते आणि आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. अनेक नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मोठ्या नेत्याबद्दल विधान केले आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे. तसेच नागपुरातील हिवाळी अधिवेशनादरम्यानही सुधीर मुनगंटीवार हे गैरहजर आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. आता यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
सुधीर भाऊ हे आमचे ज्येष्ठ नेते आहे. मी त्यांच्याशी बोललो आहे. पक्षाने त्यांना विशेष जबाबदारी देण्याचे ठरवले आहे. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेता त्यांना काही विशिष्ट जबाबदारी घेण्याचा मानस केला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
त्यामुळे काहीतरी विचार करून त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही. शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्हीही गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे काही वेळा सरकारमध्ये काम करणार पक्षात काम करतात आणि पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात. सुधीर भाऊ अतिशय अनुभवी नेते आहेत. ते महाराष्ट्राचे अध्यक्षही होते. त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांना काही तरी विचार करुनच मंत्रिमंडळात घेतलेले नाही, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात भाजपचे किती मंत्री?
१ | भाजपा | चंद्रकांत पाटील |
२ | भाजपा | मंगलप्रभात लोढा |
३ | भाजपा | राधाकृष्ण विखे पाटील |
४ | भाजपा | पंकजा मुंडे |
५ | भाजपा | गिरीश महाजन |
६ | भाजपा | गणेश नाईक |
७ | भाजपा | चंद्रशेखर बावनकुळे |
८ | भाजपा | आशिष शेलार |
९ | भाजपा | अतुल सावे |
१० | भाजपा | संजय सावकारे |
११ | भाजपा | अशोक उईके |
१२ | भाजपा | आकाश फुंडकर |
१३ | भाजपा | माधुरी मिसाळ |
१४ | भाजपा | जयकुमार गोरे |
१५ | भाजपा | मेघना बोर्डीकर |
१६ | भाजपा | पंकज भोयर |
१७ | भाजपा | शिवेंद्रराजे भोसले |
१८ | भाजपा | नितेश राणे |
१९ | भाजपा | जयकुमार रावल |