कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रायगडावरून तीन मोठ्या घोषणा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं.

कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रायगडावरून तीन मोठ्या घोषणा
Follow us
| Updated on: Jun 02, 2023 | 12:16 PM

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आणि शिवसृष्टीसाठी 350 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर शानदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत यांच्यासह शेकडो मंत्री आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी ऑनलाईन संवाद साधत शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पारंपारिक पद्धतीने पूजाविधी करण्यात आला. भगवे झेंडे, पताक्यांनी संपूर्ण रायगड परिसर सजून गेला होता. त्यामुळे हा संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.

हे सुद्धा वाचा

शिवसृष्टीसाठी 50 कोटी

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवभक्तांना संबोधित केले. यावेळी त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या. मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच प्रताप गडाच्या संवर्धनासाठी प्रतापगड प्राधिकरणाची घोषणाही करण्यात आली. या प्राधिकरणाचे अध्यक्ष उदयनराजे भोसले असतील. तर शिवसृष्टी उभारण्यासाठी 50 कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

शिवसंकल्प पूर्ण करणार

शेतकऱ्यांसाठी नमो कल्याण योजना सुरु करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु आहे. महिलांसाठी अनेक योजना सुरु करुन महिलांना सन्मान दिला आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनावर भर देण्यात येणार आहे. जनकल्याणाचा शिवसंकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. शिवरायांच्या कल्पनेतील सुराज्य आणणार आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

रयतेच्या हक्कांचं संरक्षण करणार

350 व्या राज्याभिषेक सोहळ्याला आपल्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. शिवराय आणि मावळ्यांच्या शौर्याला विनम्र अभिवादन करतो. आज सोहळ्याला आपण उपस्थित आहोत, हे आपलं भाग्य आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष आहे. शिवरायांच्या विचारांवरच आपल्या सरकारचा कारभार आहे. रयतेच्या हक्कांचं रक्षण करणार हे आपलं सरकार आहे, असं त्यांनी सांगितलं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.