‘कमिशनमधून थोडं वाट ना बाबा’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याचं वक्तव्य, असं का म्हणाले?

"देशातलं एकमेव राज्य आहे की ज्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे दाढीवाल्याने घेतला आहे. लाडकी बहीण योजना सुरू केली. पैसे मिळणार नाही असं सांगितलं जात होतं. मात्र पैसे मिळाले", असं शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

'कमिशनमधून थोडं वाट ना बाबा', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याचं वक्तव्य, असं का म्हणाले?
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 9:35 PM

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते तब्बल 1350 मुलींना सायकलींचे वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणात जोरदार फटकेबाजी केली. “सायकलीची मला पण लहानपणी आवड होती. एकदा भाड्याने सायकल घेतली. 50 पैसे तेव्हा भाडं होतं. अर्ध्या तासाचं भाडं होतं. मात्र मी एकटाच सायकल फिरवली आणि 25 पैसे दिले. त्यामुळे सायकलवाल्याने माझ्या वडिलांना तक्रार केली आणि माझ्या वडिलांनी मला खूप बदडलं. तो मार खाणारा गुलाबराव पाटील आज बहिणींना सायकल वाटप करतो ही हीच मोठी आनंदाची बाब आहे. बरेच राजकारणी लोक माझ्यावर टीका करतात आणि मी सायकल देतो तुम्ही टायर तर देऊन बघा. कपाळ करंट्यानहो तुम्हाला करता आलं नाही. तुम्हाला फक्त मजूर फेडरेशनच कमिशन घेता येतं. बाकी दुसरं काही करता येत नाही. कमिशनमधून थोडं वाट ना बाबा, दोन हजारांची पावती फाडतो आणि चार वेळेस मोबाईल आणि व्हाट्सअपवर टाकतो”, अशा शब्दांत मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचे राजकीय विरोधक माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यावर हल्लाबोल केला.

“गुलाबराव पाटलाने गरिबी पाहिलेली आहे. चटणीवर पाणी खाणारा हा गुलाबराव पाटील आहे. प्रारब्धात असेल तर सगळं काही मिळेल. नशिबात असेल तर छप्पर फाडके देगा. त्याला कोणाला सांगायची गरज नाही. माझी मुलगी माझी खूप काळजी घेते. ज्यांना मुलगी नाही, त्यांना विचारा मुलगी काय असते. मुलगी पाहिजे माणसाला. मुलगी ही आईचं रूप आहे. मुलगी ही बहिणीचं रूप आहे. मुलगी ही देवीचं रूप आहे. पण नराधम जे काम करत आहेत ना ते अत्यंत चुकीचं काम करत आहेत. त्यामुळे घरातल्या मुलाकडे दुर्लक्ष झाले तर चालेल पण मुलीकडे लक्ष द्या. तिच्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. माझी हात जोडून तुम्हाला विनंती आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

‘लाईन लगी है सब’

“आमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महिला, मुलींसाठी खूप काही केलं आहे. हे सरकार सुद्धा मुली आणि महिलांच्या पाठीशी उभं आहे. लाडकी बहिण योजना, महिलांना अर्ध टिकीट केलं. मोठ्या आनंदात महिला भगिनी बसने प्रवास करतात. हे एकनाथ शिंदेने केलं दाढीवाल्याने, ते बी दाढीवाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी बी दाढीवाले आणि गुलाबराव दाढीवाले. लाईन लगी है सब”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

गुलाबराव पाटील यांची मविआवर टीका

“देशातलं एकमेव राज्य आहे की ज्या ठिकाणी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे एकनाथ शिंदे दाढीवाल्याने घेतला आहे. लाडकी बहीण योजना सुरू केली. पैसे मिळणार नाही असं सांगितलं जात होतं. मात्र पैसे मिळाले. आता म्हणतात निवडणुकीनंतर योजना बंद होईल. अडीच वर्षे त्यांनी काय केलं नाही. मीच काय माझ्यापेक्षा जेष्ठ राजकारणी आहेत त्यांना पण विचारा”, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली.

“असा कोणता मुख्यमंत्री आहे की तो १३ वेळेस एका जिल्ह्यामध्ये येतो? मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये आला त्याचं नाव एकनाथराव शिंदे आहे. देण्याची दानत माझ्या नेत्यांमध्ये आहे आणि हेच गुण आमच्यामध्ये आहे. जसं पाण्याचा उगम होतो आणि ते वाहत राहतं त्या पद्धतीने एकनाथराव शिंदे आमचा स्त्रोत आहे आणि त्या ठिकाणाहून आमचा उगम झाला आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. महिलांनो लाडके बहिण योजनेचे पैसे बंद होणार नाहीत. कुणाच्या भूलथापांना बळी पडू नका. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं तर दीड हजाराचे तीन हजार रुपये करण्याची ताकद आपल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवली आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.