Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’बद्दल मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana : "लाडकी बहिण योजनेनंतर काही जण म्हणाले, लाडक्या भावांच काय? असं विचारत आहेत, ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही, त्यांच कसं व्हायच? त्यांना लाडकी बहिण योजना कशी कळणार?" असं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Ladki Bahin Yojana : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'बद्दल मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 3:23 PM

विधिमंडळाच सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मागच्या आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ची घोषणा केली होती. आज या योजनेचा फॉर्म मिळवण्यासाठी राज्यातील विविध केंद्रांवर मोठी गर्दी झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’संदर्भात मोठी घोषणा केली. “या योजनेसाठी जीआर काढण्यात आला आहे. योजनेतील पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये आणि वर्षाला 18000 रुपये सरकार देणार” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “1 जुलैपासून ही योजना सुरु झाली आहे. 46000 हजार कोटी रुपये माता-भगिनींना देणार आहोत. त्याचा तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे होता. जनतेला काही द्यायच म्हटलं की, विरोधकांच्या पोटात दुखतं” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

“जे चांगलं आहे, ते चांगलं म्हटलं पाहिजे, जिथे चुकत असेल तिथे सूचना करा. विरोधी पक्षाने चांगलं म्हटलं असं ऐकिवात नाही. कौतुक करता येत नसेल, तर बिनबुडाची टीका टाळली पाहिजे” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ हा मी, दोन्ही उपमुख्यमंत्री महायुती सरकारच्या भावंडांकडून बहिणींना दिलेला माहेरचा आहेर आहे. हा आहेर नियमित देत राहणार. काळजी करु नका. आपल्याकडे जो जुना डेटाबेस आहे, त्यातून माहिती घेऊन 2.50 लाख बीपीएल धारकांसाठी तात्काळ योजना सुरु होईल” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

‘ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही, ते…’

“कुणीही सरकारी कर्मचारी बहिणीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला निलंबित करुन जेलमध्ये टाकू. माता-भगिनींनी एक रुपया द्यायचा नाही. जो मागत असेल, त्याची तक्रार करा. जेलमध्ये टाकू, बाहेर येऊ देणार नाही” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “लाडकी बहिण योजनेनंतर काही जण म्हणाले, लाडक्या भावांच काय? असं विचारत आहेत, ज्यांना सख्खे भाऊ समजले नाही, त्यांच कसं व्हायच? त्यांना लाडकी बहिण योजना कशी कळणार?” असं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.