Cm Eknath Shinde : आनंद दिघेंशी सर्वाधिक प्रतारणा तुम्ही केली, मुख्यमंत्र्यांवर केदार दिघेंचा आरोप, सणसणाटी ट्विटमध्ये आणखी काय?

मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी एक सणसणीत ट्विट केलं आहे आणि त्यात ट्विटमधून त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आहे.

Cm Eknath Shinde : आनंद दिघेंशी सर्वाधिक प्रतारणा तुम्ही केली, मुख्यमंत्र्यांवर केदार दिघेंचा आरोप, सणसणाटी ट्विटमध्ये आणखी काय?
आनंद दिघेंशी सर्वाधिक प्रतारणा तुम्ही केली, मुख्यमंत्र्यांवर केंदार दिघेंचा आरोप, त्या सणसणीत ट्विटमध्ये आणखी काय?Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 8:10 PM

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) हे आज नाशिक दौऱ्यावर होते. त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी एक तुफानी भाषण केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीबाबत ही वक्तव्य केलं. मी ज्या दिवशी मुलाखत देईल, त्या दिवशी राज्यात राजकीय भूकंप होईल. असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच आनंद दिघे (Anand Dighe) यांच्याबाबत राजकारण झालं, त्याबाबतही मी लवकरच खुलासा करणार आहे, असेही विधान केले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी एक सणसणीत ट्विट केलं आहे आणि त्यात ट्विटमधून त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आहे. आनंद दिघे यांच्याबाबत एवढं काही घडलं हे तुम्हाला माहीत होतं, तर तुम्ही आजपर्यंत गप्प का बसला? असा थेट सवाल केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलाय. त्यावरून आता राज्यातलं राजकारण पुन्हा पेटलं आहे.

केदार दिघे नेमकं काय म्हणाले?

याबाबत ट्विट करत केदार दिघे म्हणतात, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार….मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल? असा थेट सवाल त्यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

केदार दिघे यांचं ट्विट

मुख्यमंत्री दिघेंना काय प्रत्युत्तर देणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या प्रत्येक भाषणात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे नाव आवर्जून घेतात. आज नाशिकमध्ये ही त्यांनी तेच केलं मात्र आज मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री आनंद दिघे यांच्याबाबत कोणता खुलासा करणार? हा सस्पेन्स तयार झाला आहे. मात्र त्यालाच आता केदार दिघे यांचे तिखट सवाल आल्याने मुख्यमंत्री या प्रश्नांना कशी आणि काय उत्तरं देणार? हेही पाहणे तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र या सवाल जबाबावरून हे प्रकरण पुन्हा तापलं आहे, एवढं मात्र नक्की.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.