Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश

महाआवास अभियानांतर्गत घरकुल लाभार्थ्यांना घराची चावी देऊन ई-गृहप्रवेशाचा कार्यक्रम आज (15 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या.

महाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश
UDDHAV THACKERAY
Follow us
| Updated on: Jun 15, 2021 | 8:36 PM

मुंबई : महाआवास अभियानांतर्गत घरकुल लाभार्थ्यांना घराची चावी देऊन ई-गृहप्रवेशाचा कार्यक्रम आज (15 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या. तर याचवेळी ई-गृहप्रवेशांतर्गत राज्यभरातील एकूण 3 लाख 22 हजार 929 लाभार्थ्यांना त्या-त्या जिल्ह्यात चाव्यांचे वितरण करण्यात आले. (CM Uddhav Thackeray hand over key of home to more than 3 lakh Gharkul beneficiaries under the Maha Awas Abhiyan scheme)

या कार्यक्रमास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राहूल शेवाळे, खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते. विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

4 लाख 67 हजार 953  घरांचे काम एका महिन्यात पूर्ण होणार

“मागील दीड वर्षापासून राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना आपण नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा असे आवाहन करत होतो. परंतू घर नसलेल्यांनी घरात कसे राहायचे ? भूमिहीनांनी घरात सुरक्षित कसे राहायचे हा प्रश्न होता.  ज्याचे उत्तर आज ग्रामविकास विभागाने दिले आहे. 100 दिवसात 8 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ग्रामविकास विभागाने निश्चित केले होते. त्यातील 3 लाख 22 हजारांहून अधिक घरकुले बांधून पूर्ण झाली. ज्याच्या चाव्या आज आपण लाभार्थ्यांना दिल्या आहेत. तर उर्वरित 4 लाख 67 हजार 953  घरांचे काम एक महिन्यात पूर्ण होणार आहे,”असे मुख्यमंत्री म्हणाले.

15 लाख लोकांच्या डोक्यावर महाआवासमुळे छत

तसेच पुढे बोलताना , “शासन अनेक योजना राबवते. त्यात अनेक योजना केवळ जाहीर होतात. पण ग्रामविकास विभागाने जलदगतीने घरं बांधून गोरगरीबांना त्यांचे हक्काचे घर मिळवून दिले आहे. त्याबद्दल मी यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. 3 लाख 22 हजार 929 घरकुलात राहणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षात घेतली तर आज 15 लाख लोकांच्या डोक्यावर महाआवास अभियानातील घरकुलांनी छत उपलब्ध करून दिले आहे. त्यांना सुरक्षित केले आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अभियानात गवंडी प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम

अभियानात गवंडी प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल विभागाचे कौतूक करून मुख्यमंत्री म्हणाले की, घरांच्या बांधणीसाठी लागणारे साहित्य महिला बचत गटांच्या “घरकुल मार्ट”मधून उपलब्ध करून देऊन त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे कामही ग्रामविकास विभागाने केले आहे. हे सर्वसामान्य जतनेचे स्वप्नं पूर्ण करणारे शासन आहे. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अभियानाची वैशिष्ट्ये

>>> मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या देण्यात आल्या. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

>>> अभियानामुळे सर्वसामान्यांसाठी सर्व सोयींनी युक्त 3 लाख 22 हजार 929 घरकुले पूर्ण झाली.  आज या सर्व लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यात चावीचे वितरण करण्यात आले.

>>>  4 लाख 67 हजार 953 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

>>>  घरासाठी आर्थिक सहाय्य देण्याबरोबर भूमिहीन लाभार्थ्यांना विविध योजनेतून घरकुल उभारणीसाठी शासनाने जागा उपलब्ध करुन दिल्या. या लाभार्थ्यांची संख्या 50 हजार 112 आहे.

>>> वाळूसहीत इतर बांधकाम साहित्याची उपलब्धता केल्याने अभियान कालावधित घरांची उभारणी वेगाने होऊ शकली.

>>>  महिला बचत गटाच्या सहकार्याने लाभार्थ्यांना वाजवी दरात बांधकाम साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी 612 “घरकुल मार्ट” उभारण्यात आले.

>>>  गवंडी प्रशिक्षाणवर भर दिला. आतापर्यंत 8 हजार 815 गवंड्यांचे प्रशिक्षण पूर्ण. तर 13 हजार 295 गवड्यांचे प्रशिक्षण प्रगतीपथावर.

>>>  घरकुल लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अभियानात प्रयत्न करण्यात आले.  यासाठी विविध विभागांच्या योजनांचा कृतीसंगम करण्यात आले.

>>> जागेची अडचण असलेल्या ठिकाणी 1286 बहुमजली इमारती बांधण्यात आल्या.

इतर बातम्या :

Video : संभाजीराजेंच्या बैठकीत काही काळ गोंधळ, राजेंच्या आवाहनानंतर कार्यकर्ते शांत

लॉकअप तोडून कुख्यात दरोडेखोर पळाला, पोलिसांना चकवा देत महाराष्ट्रभर हिंडला, अखेर मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

आठवडाभरात प्रतिज्ञापत्र सादर करा, शाळांच्या फी वसुलीच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

(CM Uddhav Thackeray hand over key of home to more than 3 lakh Gharkul beneficiaries under the Maha Awas Abhiyan scheme)

शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?
वणी गडावर भविकांची चेंगराचेंगरी? भाविकांमध्ये ढकलाढकली, नेमकं काय घडल?.
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही...
सोलापुरात संतापजनक प्रकार, बाळाला नुकताच जन्म अन् टाके असतानाही....
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून मी शिकलो - छगन भुजबळ.
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली
'बैलजोडी जप्त करू..', धमकी देऊन गरीब शेतकऱ्याकडून केली वसूली.
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर
'वतन के, धर्म के गद्दार..', मानखुर्दमध्ये राऊतांच्या विरोधातले बॅनर.