CM Uddhav Thackeray Speech Highlights : महाराष्ट्रातील लॉकडाऊन 15 जूनपर्यंत वाढवला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
राज्यातील कोरोना परिस्थिती बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांसाठी वाढवला आहे (CM Uddhav Thackeray Speech).
मुंबई : राज्यातील कोरोना परिस्थिती बघता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन आणखी 15 दिवसांसाठी वाढवला आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन हा आता 15 जूनपर्यंत असणार आहे. मे महिन्यात काही जिल्ह्यांमधील परिस्थितीत नियंत्रणात आली तर काही ठिकाणी रुग्णसंख्येत वाढ झाली. त्यानुसार लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. तसेच ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे त्या भागातील निर्बंध आणखी कडक करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत (CM Uddhav Thackeray Speech).
‘…तर तिसऱ्या लाटेचा सामना करणं कठीण होईल’
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात खाली आली आहे. पण आपण अद्यापही कोरोनाच्या नव्या विषाणूवर ताबा मिळवू शकलेलो नाही. अशा परिस्थितीत तिसरी लाट आली तर सर्व कठीण होऊन बसेल. आपण रुग्णालये, बेड्स, ऑक्सिजन सर्व व्यवस्था उभी करण्याता प्रयत्न करु. पण तरीही कोरोनाचा नवा म्युटेट आणि तिसरी लाटचा सामना करणं कठीण होईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
‘कोरोना काळात धान्य वाटप, 55 लाख शिवभोजन थाळ्या मोफत’
“कोरोना काळात धान्य वाटप केलं. 55 लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या. फेरीवाल्यांसाठी निधी दिला. आपला महाराष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी काम करत आहोत. काही निर्बंध लादावे लागतात. त्यापेक्षा वाईट काम नाही. जी जनता आपल्याला आपलं मानते त्यांच्यावर बंधनं लादणं यापेक्षा कटू काम कोणतंही असू शकत नाही. कोरोना लाट खाली यायला लागली आहेत. त्यामुळे निर्बंध काढणार का? असं काही लोक विचारत आहोत. आपली आजची परिस्थिती थोडीशी कमी झाली आहे. पण आजची जी मृतसंख्या ही गेल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्याच्या बरोबरीचं आहे. गेल्यावेळीची लाट ही सणासुदीनंतर आली होती. अजूनही आपण म्हणावं तेवढँ खाली आलोलो नाही. रुग्णसंख्या कमी होत आली असली तरी गेल्यावेळीची सर्वोच्च रुग्णसंख्येच्या बरोबरीची संख्या आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हल्कीशी वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण आपल्याला थांबवायला हवं”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. आताचा जो विषाणू आहे तो झपाट्याने वाढतो आहे. तो झपाट्याने पसरतोय. रुग्णाला बरं व्हायला उशिर लागतोय. ऑक्सिजनची आवश्यकता वाढली. काही जणांना ऑक्सिजनची गरज जास्त लागली. ही वस्तूस्थितीत आहे”, असं मुख्यमंत्री म्हणाले (CM Uddhav Thackeray Speech).
“सध्या कोरोना रुग्ण कमी होत आहेत. त्यामुळे निर्बंध उठवण्यात येतील का? असा प्रश्न उभा राहतोय. सध्या रुग्णसंख्या ही मागील लाटेच्या सर्वोच्च शिखराएवढी आहे. म्हणजे रुग्णांचा उच्चांक आहे त्याची तुलनात्मक माहिती देणारच आहे. साधारण 17 ते 19 सप्टेंबर 2020 च्या सुमारास आपल्या राज्यात 24 हजार 886 रुग्ण एका दिवसात सापडत होती. आता 26 मे रोजी बघायचं झालं तर साधा 24 हजार 752 रुग्ण आढळले आहेत. म्हणजेच म्हणावे तेवढे रुग्ण कमी झालेले नाहीतेय. पहिल्या लाटेच्या उच्चांकात सक्रिय रुग्ण साधारण 3 लाख 1752 होते. आज 26 मे ला तीन लाख 1542 आहेत. म्हणजे मागील लाटेच्या उच्चांकाच्या आपण आज बरोबरीला आहोत. एक मात्र दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यावेळी 78 टक्के होते. आता यावेळा या दिवसांमध्ये प्रमाण 92 टक्के आहे. मृत्यूदरसुद्धा गेल्या वेळेला 2.65 टक्के होता यावेळा तो 1.62 टक्के आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
LIVE NEWS & UPDATES
-
कोरोनामुक्त गाव ही मोहीम आजपासून राबवायची आहे : उद्धव ठाकरे
मी माझं गाव कोरोनामुक्त करेन असं प्रत्येकाने ठवरलं. सगळ्यांनी माझं घर कोरोनामुक्त ठेवायचं ठरवलं तर आणि असाच प्रयत्न सगळ्यांनी केला तर सगळा महाराष्ट्र कोरोनामुक्त होऊ शकतो. असं अनेक ठिकाणी घडलं आहे. पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमलताई यांनी हे करुन दाखवलं आहे. आजपासून आपण गाव कोरोनामुक्त करायचं आपण ठरवायचं आहे.मी तिघांशी बोलणार आहे. तुमच्याशी त्यांचं बोलणं करुन देणार आहे.
-
कोविडसोबत राहायचं नाही तर त्यावर मात करायची आहे : उद्धव ठाकरे
शिक्षण सुरु ठेवले पाहीजे. त्यावर निर्णय घेत आहोत. वर्क फ्रॉम होम सारखं शिक्षणाचं करता येईल का या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आहेत. तिसऱ्या लाटेवर चर्चा करताना मी उद्योगपतींशी चर्चा केली होती. अर्थचक्र फिरतं राहिलं पाहिजे. तसंच शिक्षणाच्या बाबतीत झालं पाहिजे. आपल्याला कोविडसोबत राहायचं नाही तर त्यावर मात करायची आहे.
-
-
बारावीच्या परीक्षेवर लवकरच निर्णय, आढावा घेत आहोत : उद्धव ठाकरे
शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. या वर्षी दहावीच्या परीक्षा न घेता त्यांचे मुल्यांकन करुन त्यांचा निकाल लावणार आहोत. बारावीच्या परीक्षांचासुद्धा निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी कोणती पद्धत ठेवता येईल याचा आढावा घेत आहोत. त्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल. याबाबत केंद्रानेसुद्धा धोरण ठऱवायला हवे. बारावीचा निर्णय देशभर सारखा पाहिजे. यावर केंद्राने धोरण आखायला हवे. शिक्षणाच्या बाबतीत क्रांतीकारक निर्णय घेणे गरजेचे आहे.
-
तिसरी लाट लक्षात घेऊन बालरोग तज्ज्ञाची टास्कफोर्स तयार : उद्धव ठाकरे
तिसरी लाट बालकांमध्ये येऊ शकेल. मात्र बलकांमध्ये रोगप्रतिकाशक्ती जास्त आहे. लहान मुलांमध्ये ही साथ येऊ नये अशी प्रार्थना करतो. जर ही लाट आली तर ती आपल्यामुळेच येऊ शकते. त्यामुळे आपण मुलांना कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. मी महाराष्ट्रातील बालरोग तज्ज्ञाची टास्कफोर्स तयार केली आहे. त्यांच्याशी चर्चा केली आहे. कुठेही सरकार म्हणून आपण कमी पडत नाहीयोत. जे शक्य होईल ते आपण करत आहोत.
-
रस्त्यावर उतरणं म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण देणं : मुख्यमंत्री
शेतकरी अन्नदाते आहेत. त्यांनी काळजी घ्यावी. कृषीविषयक सर्व कामे सुरु राहतील. फक्त गर्दी करु नका. ही दुसरी लाट अपेक्षापेक्षाही मोठी होती. अनेकांनी जवळती माणसं गमावली. काही माणसं हा हा म्हणता म्हणता सोडून गेली. काही बालकं अनाथ झाले. केंद्र सरकारने अशा बालकांसाठी मोहिम राबवली आहे. राज्य सरकारही या बालकांना पोरकं होऊ देणार नाही. आम्ही त्याबाबत योजनेची अंमलबजावणी करत आहोत. निर्बंध 15 दिवस वाढवावे लागत आहेत. काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध आणखी कडक करावे लागतील. आता हळूहळू काही लोक सुरु होतील. आम्ही कोरोना बघणार नाही. रस्त्यावर उतरु. पण तुम्ही असं करु नका. रस्त्यावर उतरणार असाल तर कोरोना योद्धे म्हणून उतरा, कोरोनादूत म्हणून उतरु नका. आपल्या आजूबाजूच्या घरामध्ये बघा. निर्बंध आपण उठवणार आहोतच. पण रस्त्यावर उतरणं म्हणजे तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणं. तिसऱ्या लाटेचं निमंत्रक होऊ नका. बदलेला विषाणूचा अवतार बघून आपल्याला निर्बंध कडक करावे लागतील. कोरोनामुक्त गाव ही योजना सफल केली तर तिसरी लाट येणारच नाही.
-
-
पावसाळा येत आहे, अशावेळी फॅमीली डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची : उद्धव ठाकरे
मी एक नवी संकल्पना मांडली आहे. माझा डॉक्टरची ही संकल्पना आहे. या डॉक्टरला कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती असते. मी या डॉक्टरांना आवाहन केले. या सर्व डॉक्टरांशी मी संवाद साधला. हे डॉक्टर्स वाडी, वस्ती, पाड्यातले आहेत. त्यांना मी आवाहन केले आहे. त्यांनीही प्रतिसाद दिला आहे. सध्या पावसाळा येत आहे. त्यामुळे कोरोनाचे लक्षणं दिसू शकतात. अशा वेळी हे डॉक्टर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
-
‘आता कोरोनामुक्त गाव ही मोहिम राबवायची आहे’
ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे आपण कोरोनामुक्त गाव असं ठरवलं तर गाव कोरोनामुक्त होईल. प्रत्येकाने घर कोरोनामुक्त करायचं ठरवलं तर आपलं घर कोरोनामुक्त होईल. माझं घर कोरोनामुक्त होईल. पोपटराव पवार आणि दोन तरुण सरपंचांनी त्यांच्या गावातून कोरोना हद्दपार केला. आपल्याला कोरोनाला हद्दपार करायचा आहे. आपल्याला कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवायची आहे
-
राज्यात ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 1200 मेट्रिक टन, ते दिवस आठवले की आजही घाम फुटतो : उद्धव ठाकरे
सध्या कोरोना चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ऑक्सिजन बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स वाढवलेले आहेत. सध्या अजूनही आपल्याला ऑक्सिजनची गरज भासते. ते दिवस आठवून आजही मला घाम फुटतो. ऑक्सिजन काही तासांपुरताच राहायचा, असे फोन यायचे तेव्हा काय करायचं हा प्रश्न व्यवस्थेपुढे उभा राहायचा. आपल्या राज्यात ऑक्सिजन निर्मितीची क्षमता 1200 मेट्रिक टन आहे. मात्र या लाटेत आपल्याला दिवसाला 1700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला.
-
‘तौत्के वादळ स्पर्शून गेलं, बाधितांना नुकसान भरपाई दिली जाईल’
महाराष्ट्र दिनानंतर आज पहिल्यांदा भेटतोय. एक महिन्यात आपण नेमके कुठे आहोत, पुढे काय करायला हवं याची माहिती देणं गरजेचं आहे, मी सर्वांना धन्यवाद देतो. कारण वर्ष-दीडवर्ष आपण निर्बंध पाळत आहात. तौत्के हे सगळ्यात भीषण वादळ होतं. हे वादळ गुजरातला धडकलं. हे वादळं दरवर्षी आदळत आहेत. याविरोधात सामना करताना तारांबळ उडते. संपूर्ण किनारपट्टीहून लोकांना हलवणं, ते हलवताना कोविडचे नियम पाळणं हे खूप विचित्र असतं, आपण थोडक्यात निभावलं. हे वादळ आपल्याला स्पर्शून गेलं. मी धावता दौरा केला.
-
‘फॅमिली डॉक्टरने कोविड आणि नॉन कोविड रुग्ण ओळखावं, रुग्णांची योग्य काळजी घ्यावी’
पावसाळ्यात साथीचे आजार आहेत. त्यात कोरोना आहे. त्यामुळे कोरोना रुग्ण ओळखणं अवघड आहे. अशावेळी आपण आप्लाय फॅमिली डॉक्टरकडे जातो. 70 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नसतात. पण ते घाबरुन हॉस्पिटलमध्ये जातात. त्यामुळे गरज असलेल्यांना बेड्स मिळत नाहीत. त्यामुळे आपण त्यांना विनंती करतो. हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज नाही, अशी विनंती करतो. मृत्यूदर वाढतोय. त्यामागे कारण म्हणजे रुग्ण घरच्याघरी जास्त सिरिअस होतात. त्यामुळे त्यांना वाचवणं अवघड होतं. अशावेळी फॅमिली डॉक्टरची जबाबदारी वाढते. फॅमिली डॉक्टरने कोविड आणि नॉन कोविड रुग्ण ओळखावं. बाधित असल्यास त्याला विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला द्यावा. फॅमिली डॉक्टरने चांगला प्रतिसाद दिला आहे.
-
आपण अद्याप नव्या कोरोना विषाणूवर ताबा आणू शकलेलो नाहीत, त्यात तिसरी लाट आली तर अवघड होईल : मुख्यमंत्री
ऑक्सिजनसाठी खूप तारांबळ उडाली. बाहेरच्या राज्याहून ऑक्सिजन आणावे लागत होते. ही संपूर्ण यातायात कशी निभावून नेली ते प्रशासनाचं कौतुक करावं लागलं. हे सगळं फार तारेवरची कसरत होती. आता जो अवतार बदललेला विषाणू आहे त्याच्यावर आपण ताबा आणलेलं नाही. हा विषाणू आता सुटला आणि तिसरी लाट आली तर आपल्याला फार कठीण जाईल. त्यामुळे फार काळजी घ्यावं लागणार आहे. हे कमी होतं की काय आता काळी बुरशी आलेली आहे. राज्यात म्युकोरमायकोसीसचे तीन हजार रुग्ण आहेत. या विरोधात लढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत आहोत.
-
लोकांवर निर्बंध लादणे हे सर्वात वाईट, पण सर्वांच्या सुरक्षेसाठी करावं लागतं : उद्धव ठाकरे
राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना आतापर्यंत तीन हजार 865 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. आपला महाराष्ट्र सुरक्षित राहावा म्हणून हे सगळं काही करण्यात येत आहे. लोकांवर निर्बंध लादणे हे सर्वात वाईट आहे. जी जनता आपल्यावर प्रेम करते त्यांच्यावर निर्बंध लादणे हे कटू काम आहे. पण सर्वांच्या सुरक्षेसाठी निर्बंध लावावे लागत आहेत.
-
‘तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून, नवा विषाणू जास्त घातक’
तिसरी लाट आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. आताचा जो विषाणू आहे तो झपाट्याने वाढतो आहे. तो झपाट्याने पसरतोय. रुग्णाला बरं व्हायला उशिर लागतोय. ऑक्सिजनची आवश्यकता वाढली. काही जणांना ऑक्सिजनची गरज जास्त लागली. ही वस्तूस्थितीत आहे.
-
निर्बंध अद्याप हटवणार नाहीत, मुख्यमंत्र्यांचे संकेत
कोरोना काळात धान्य वाटप केलं. 55 लाख शिवभोजन थाळ्या मोफत दिल्या. फेरीवाल्यांसाठी निधी दिला. आपला महाराष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी काम करत आहोत. काही निर्बंध लादावे लागतात. त्यापेक्षा वाईट काम नाही. जी जनता आपल्याला आपलं मानते त्यांच्यावर बंधनं लादणं यापेक्षा कटू काम कोणतंही असू शकत नाही. कोरोना लाट खाली यायला लागली आहेत. त्यामुळे निर्बंध काढणार का? असं काही लोक विचारत आहोत. आपली आजची परिस्थिती थोडीशी कमी झाली आहे. पण आजची जी मृतसंख्या ही गेल्या लाटेतील सर्वाधिक रुग्णसंख्याच्या बरोबरीचं आहे. गेल्यावेळीची लाट ही सणासुदीनंतर आली होती. अजूनही आपण म्हणावं तेवढँ खाली आलोलो नाही. रुग्णसंख्या कमी होत आली असली तरी गेल्यावेळीची सर्वोच्च रुग्णसंख्येच्या बरोबरीची संख्या आहे. रुग्णसंख्या कमी असली तरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हल्कीशी वाढताना दिसत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे प्रमाण आपल्याला थांबवायला हवं.
-
किनारपट्टीवर कायमस्वरुपी उपायोजना करणे गरजेचे : उद्धव ठाकरे
ही अशी संकटं दरवर्षी आपल्याला त्रास देणार असतील तर आपल्या किनारपट्टीवर कायमस्वरुपी उपायोजना करण्याची गरज आहे. वादळामध्ये वीज खंडित होते. झाडे उन्मळून पडतात. या गोष्टीचा विचार करुन विजेचा पुरवठा भूमीगत करावा लागेल. तसेच काही घरे भूकंपरोधित बांधावे लागतील. या गोष्टीवर आपण काम करणे सुरु केले आहे. या बाबतीत केंद्र सरकारशी बोलणे सुरु केले आहे. मला खात्री आहे केंद्र आपल्याला या बाबतीत मदत करेल.
-
‘नैसर्गित आपत्तीविरोधात लढण्यासाठी आता योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता’
नुकसानग्रस्तांना मदतीसाठी जे निकष आहेत ते केंद्र सरकारने बदलायला हवेत. जेणेकरुन लोकांना जास्त मदत करता येईल. तसेच किनारपट्टी परिसरात महत्त्वपूर्ण उपाययोजना करावे लागतील. भूकंपरोधक घरं करावे लागतील. पक्के निवारे बांधण्याची गरज आहे. कारण नैसर्गिक आपत्ती आता वारंवार येत आहेत. याबाबत आपण केंद्र सरकारशी बोलत आहोत. याबाबत केंद्र सरकारला आपल्याला नक्की मदत करेल.
-
मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, दीड वर्षांपासून तुम्ही काही बंधनं पाळत आहात : उद्धव ठाकरे
आपलं एक वेगळं नातं निर्माण झालं आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. मागील दीड वर्षांपासून तुम्ही काही बंधनं पाळत आहात. या बंधनांचा परिणाम आता दिसतो आहे. काही दिवसांपूर्वी गेल्या दशकांतील सर्वात मोठं चक्रीवादळ धडकलं होतं. अशी दुष्ट चक्रीवादळं मागील काही दिवसांपासून धडकत आहेत. एकतर कोरोनाचे संकट त्यानंतर चक्रीवादळ यामुळे फार पंचाईत होते.
तौक्ते चक्रीवादळ आल्यानंतर मी मिनिटा-मिनाटाला माहिती घेत होतो. मी रत्नागिरी सिंधुदुर्गला जाऊन आलो. मी धावता दौरा केला. या वादळाच्या वाऱ्याचा वेग काय अशा सर्व गोष्टींची माहिती घेत होतो. तिथे गेल्यानंतर नुकसानीची कल्पना आली. अनेक ठिकाणी वीज गेली होती. झाडे कोसळली होती. त्यानंतर राज्याने मदत देणे सुरु केली आहे.
Published On - May 30,2021 9:29 PM