Maharashtra lockdown Package : अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदेंची बैठक, मृतदेह विल्हेवाटीवर चर्चा

महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे. त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra lockdown Package : अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदेंची बैठक, मृतदेह विल्हेवाटीवर चर्चा
अजित पवार
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 12:22 PM

मुंबई : कोरोनाच्या विस्फोटामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन (Maharashtra lockdown) होणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे.

त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बैठक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण सध्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. याशिवाय तिन्ही विभागाचे सचिवदेखील बैठकीत हजर आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीमध्ये मृतदेह विल्हेवाट, ऑक्सिजन लिक्विड प्लान्ट, आर्थिक पॅकेज यावर चर्चा होणार आहे. (CM Uddhav Thackeray meeting with Ajit Pawar on Maharashtra lockdown update may discuss on Lockdown relief package)

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पॅकेजवर चर्चा

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आर्थिक पॅकेजवरही चर्चा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनचा फटका बसणाऱ्या कामगारवर्गाला आर्थिक पॅकेज देण्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. आधी पॅकेज, मग लॉकडाऊन अशी भाजपची भूमिका आहे. त्यामुळे आज त्याबाबत काही ठरतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लॉकडाऊन किती, 8 की 14 दिवस? 

कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) 11 एप्रिलला टास्क फोर्सची बैठक (task force meeting) घेतलीय. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची गरज असल्याचं मत व्यक्त केलं. मात्र टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी निदान 14 दिवसांचा लॉकडाऊन लागू झाला तर परिस्थिती नियंत्रणात येईल, असं मत मांडलं. त्यामुळे टास्क फोर्सचे तज्ज्ञ देखील लॉकडाऊनच्या बाजूने आहेत.

यंत्रणांचा शक्तीपात नको, लॉकडाऊन आवश्यक : मुख्यमंत्री 

कोरोनाचा उद्रेक रोखून साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे संकेत दिले आहेत. यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, दुसरा पर्याय नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी 10 एप्रिलला सर्वपक्षीय बैठक (Maharashtra all party meeting) बोलावली होती.  महाराष्ट्राच्या लॉकडाऊनसंबंधात (Maharashtra lockdown) तब्बल सव्वा दोन तास खलबतं या बैठकीत झाली.

“लॉकडाऊन करायची वेळ आली आहे, कारण यंत्रणांचा शक्तीपात होऊ नये. निर्णय घेण्याची वेळ आली आहे, लॉकडाऊन हा एकमेव मार्ग नाही पण जगानेही तो स्वीकारला आहे”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय सर्वांच्या सूचना ऐकल्या, चांगल्या आहेत. पण निर्बंध आणि सूट दोन्ही एकाचवेळी शक्य नाही. येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

 पूर्ण लॉकडाऊनमुळे उद्रेक होईल : फडणवीस 

व्यापाऱ्यांचे गेले वर्ष त्यांचे वाया गेले. कर, वीज बिल कर्ज व्याज भरावे लागत आहेत. त्यामुळे जीवन चालवायचे कसे हा प्रश्न जनतेसमोर आहेत. हे सर्व लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, निर्बंध असायला हवेत, पण जनतेचा उद्रेक लक्षात घ्यायला हवा, असं देवेंद्र फडणवीस  म्हणाले.

संबंधित बातम्या 

CM Uddhav Thackeray Meeting With Task Force: राज्यात 8 दिवसांच्या कडक लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत   

Maharashtra lockdown All party meet Highlights : राज्यात 8 किंवा 14 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता, मुख्यमंत्री म्हणाले, दुसरा पर्याय नाही! 

CM Uddhav Thackeray meeting with Ajit Pawar on Maharashtra lockdown update may discuss on Lockdown relief package

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.