Cm Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या टोमणे सभेची स्क्रीप्ट अबु आझमींकडून आलेली का? सभेनंतर मनसेचा खोचक सवाल

मुख्यमंत्र्यांच्या टोमणे सभेचा दुसरा अंक गोंधळलेल्या भाषणाने झाला, आम्हाला वाटलेलं टोमणे सभेची स्क्रीप्ट ही बारामतीवरुन येईल, मात्र आज आम्ही चुकलो. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची स्क्रीप्ट अबु आझमींकडून आलेली की काय याची शंका आहे, असा खोचक सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे.

Cm Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या टोमणे सभेची स्क्रीप्ट अबु आझमींकडून आलेली का? सभेनंतर मनसेचा खोचक सवाल
मनसे नेते गजानन काळेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 11:45 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या (Hindutva) मुद्द्यावरून मनसे आणि शिवसेना पुन्हा आमनेसामने आले आहे. कधी मुख्यमंत्री (Cm Uddhav Thackeray) राज ठाकरेंचा (Raj Thackeray) उल्लेख मुन्ना भाई म्हणून करतात, तर कधी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना तु काय सरदार पटेल आहेस का? असा सवाल करतात. आता एवढं राजकीय वैर पेटलं असताना आजच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर मनसेकडून टीका होणार नाही, असे घडले तर नवलच. मनसे नेते गजानन काळे यांनी यावरून आता शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या टोमणे सभेचा दुसरा अंक गोंधळलेल्या भाषणाने झाला, आम्हाला वाटलेलं टोमणे सभेची स्क्रीप्ट ही बारामतीवरुन येईल, मात्र आज आम्ही चुकलो. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची स्क्रीप्ट अबु आझमींकडून आलेली की काय याची शंका आहे, असा खोचक सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे.

गजानन काळेंची तीव्र प्रतिक्रिया

काँग्रेस राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात वाघ सापडे

तसेच संभाजीनगरच्या नावावरून मुख्यमंत्र्यांनी सभेत ब्र देखील काढला नाही. संभाजीनगर होणार की नाही याचं उत्तर शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहिलं. ना हिंदुंच्या विषयावर बोलले ना विकासाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलले. औरंगजेबाच्या थडग्याबद्दल , भोंग्यांबद्दल, नमाजबद्दल मुख्यमंत्री ब्र देखील काढत नाहीत. 3 दशकांपासून नगरसेवक, आमदार, खासदार संभाजीनगरला सेनेचा असूनही पाणी प्रश्न सोडवता आला नाही. एकाही प्रश्नावर मुख्यमंत्री स्पष्ट बोलू शकले नाहीत. “काँग्रेस राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात वाघ सापडे, हिंदू आणि मराठी जनता मारती खडे…” असा टोला त्यांनी लगावला आहे.  मुख्यमंत्र्यांची आजची सभा म्हणजे चला हवा येऊद्याचा प्रयोग,  असे म्हणत मनसे नेत्यांनी या सभेची खिल्ली उडवली आहे.

शालीनी ठाकरे यांच्याकडूनही टीका

अमेय खोपकर यांचं ट्विट

भाजपकडूनही टीकेची झोड

आज मुख्यमंत्र्यांची सभा पार पडल्यापासून भाजप आणि मनसे नेत्यांनी या सभेवर टीकेची झोड उडवली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही यावरून शिवसेनेला आणि मुख्यमंत्र्यांना जोरदार टोलेबाजी केली आहे. तर मुख्यमंत्रीही या सभेत पुन्हा भाजपलाच टार्गेट करताना दिसून आले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.