तुकाराम मुंढेंच्या पाठीशी आहात का? मुख्यमंत्री म्हणतात….

"आततायीपणा कोणीच करु नये, शिस्त लावली जात असेल, जनतेचं हीत जोपासलं जात असेल तर चांगलं आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले (CM Uddhav Thackeray on Tukaram Mundhe).

तुकाराम मुंढेंच्या पाठीशी आहात का? मुख्यमंत्री म्हणतात....
Follow us
| Updated on: Jul 26, 2020 | 9:55 AM

मुंबई : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर संदीप जोशी यांच्यातील संघर्षाची राज्यभरात चर्चा झाली. या संघर्षातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोघी समोरासमोर आल्याचं चित्र दिसलं. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी तुकाराम मुंढे यांचं समर्थन केलं आहे (CM Uddhav Thackeray on Tukaram Mundhe).

शिवसेना आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तुकाराम मुंढे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरु आहेत. इतकेच काय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशीही त्यांनी पंगा घेतलाय. तुम्ही तुकाराम मुंढेंच्या मागे आहात की लोकनियुक्त महापालिकेच्या? असा प्रश्न संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना तुकाराम मुंढे शिस्तप्रिय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत आल्यापासून तिथे शिस्त लागली आहे. त्यामुळे शिस्तीच्या मागे उभं राहणार”, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली (CM Uddhav Thackeray on Tukaram Mundhe).

“एखादा अधिकारी कठोर किंवा कडक असेल, पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणवले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्यापाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

“आततायीपणा कोणीच करु नये, शिस्त लावली जात असेल आणि जनतेचं हीत जोपासलं जात असेल तर चांगलं आहे. शेवटी जनतासुद्धा उघड्या डोळ्यांनी हे बघत असेल. त्यांच्या तोंडावर मास्क असला तरी जनतेचे डोळे उघडे आहेत हे विसरुन चालणार नाही. म्हणून मी मागेसुद्धा म्हटले होते की, हा महाराष्ट्र आहे, त्याचा धृतराष्ट्र अजून झालेला नाही आणि होऊ शकत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

सरकार तीनचाकी रिक्षाच, स्टिअरिंग माझ्याकडे, दोघे पाठी

हिंमत असेल तर सरकार पाडा” मुख्यमंत्र्यांचं भाजपला आव्हान, फडणवीसांनाही टोला

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनंतर आता संजय राऊतांचा उद्धव ठाकरेंशी ‘सामना’

फडणवीस राष्ट्रीय स्तरावरील निर्णय प्रक्रियेत कधीच नव्हते, त्यांना काही माहित नाही : शरद पवार

आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.