Ashadhi Ekadashi 2021 | पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे, तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे, मुख्यमंत्र्यांचे विठुरायाच्या चरणी साकडे
देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पांडुरंगाच्या चरणी घातले.
पंढरपूर : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पांडुरंगाच्या चरणी घातले. आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2021) पंढरपुरात विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. या पुजेच्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विठुरायाच्या चरणी साकडे घातले.
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांसह अनेकजण उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्या वतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे. आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते, जि. वर्धा (71 वर्ष) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते इंदुबाई केशव कोलते (66 वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास उद्धव ठाकरेंच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.
“हा वारसा जगापुढे ठेवावा”
पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच महापुजेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले.
गणेशोत्सवासाठीच्या कोकणातील एसटीच्या विशेष गाड्यांना चाकरमन्यांचा अल्प प्रतिसाद https://t.co/543KkXsEcC #Konkan #ST #Bus
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 20, 2021
(CM Uddhav Thackeray Rashmi Thackeray performs Vitthal Rakhumai Mahapooja occasion Pandharpur Ashadhi Ekadashi 2021)
संबंधित बातम्या :