केंद्रानं राज्याचं देणं द्यावं, मदतीसाठी हात पसरावे लागणार नाही; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना झापलं
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करणं ही राज्याची जबाबदारी असल्याचं सांगत राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलंच झापलं.
सोलापूर: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करणं ही राज्याची जबाबदारी असल्याचं सांगत राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलंच झापलं. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी माहिती घेत आहे. माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. हे शेतकऱ्यांचं सरकार असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं सांगतानाच केंद्राकडे राज्याचं देणं बाकी आहे. ते त्यांनी द्यावं. आम्हाला केंद्राकडे हात पसरावे लागणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना झापले. (cm uddhav thackeray slams bjp)
उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी त्यांना धीरही दिला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांना त्यांनी चांगलंच झापलं. मला राजकारण करायचं नाही. पण केंद्राकडे राज्याचं जे देणं बाकी आहे. ते त्यांनी आम्हाला परत द्यावं. ती मदत आली तर मदतीची गरजही पडणार नाही. केंद्र सरकारडे आम्हाला हात पसरावे लागणार नाही, असं सांगतानाच विरोधकांनी आता या विषयावर राजकारण करत बसू नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना झापलं.
राज्यात अतिवृष्टी होऊ नये ही माझी प्रार्थना आहे. पंचनामे सुरू आहेत. माहिती घेतली जात आहे. किती मदत करावी याची माहिती घेतल्यानंतर त्या माहितीचा अभ्यास करत बसणार नाही. माहिती येताच शेतकऱ्यांना मदतीला सुरुवात करू. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. गरज पडल्यास केंद्राकडेही मदत मागू, असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांसाठी जे जे करावं लागेल ते ते करू. दोन-चार दिवस नुकसानीची माहिती घेऊ. शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत करू, असं आश्वासन देत त्यांनी शेतकऱ्यांना धीरही दिला. (cm uddhav thackeray slams bjp)
संकटांचा डोंगर कायम
आम्ही सत्तेत येताच संकटांना सुरुवात झाली. न भुतो न भविष्यती अशी संकटे येत आहेत. आधी कोरोनाचं संकट आलं. आपण अजूनही तोंडाला मास्क बांधून फिरत आहोत. त्यानंतर आता अतिवृष्टीचं संकट आलं. संकटाचे डोंगर उभे राहत आहेत. पण शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने त्यातूनही आपण बाहेर पडू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
11 शेतकऱ्यांना धनादेशाचं वाटप
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नुकसानीची मोठी झळ सहन करावी लागलेल्या 11 शेतकऱ्यांना तात्काळ प्रत्येकी 95 हजाराची मदत केली. ही तात्पुरती मदत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला अजून मदत केली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
70 वर्षात असा पाऊस पाहिला नाही
यावेळी स्थानिक ग्रामस्थ शिवशंकर कोणगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडल्या. गेल्या 70 वर्षांत मी असा पाऊस पाहिला नाही. प्रचंड पाऊस झाला. गुरंढोरं वाहून गेलं. होतं नव्हतं सारं काही पाण्यात गेलं, असं सांगताना कोणगे यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना दिलासा दिला. पूर रेषा लक्षात घेऊनच सर्व गावकऱ्यांचं पूनर्वसन करम्यता येईल, असं सांगतानाच अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. गाफिल राहू नका, असा इशाराही त्यांनी ग्रामस्थांना दिला.
VIDEO | Uddhav Thackeray LIVE | हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही : उद्धव ठाकरे @OfficeofUT pic.twitter.com/yk1pAy8mR9
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 19, 2020
संबंधित बातम्या:
राज्यपालांशी वाद घालण्याची ही वेळ आहे का?; फडणवीस संतापले
CM Uddhav Thackeray Solapur Visit Live | हे तुमचं सरकार, कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री
सरकारच्या नाकर्तेपणामुळे पवार साहेबांना मुख्यमंत्र्यांचा बचाव करावा लागतोय- देवेंद्र फडणवीस
(cm uddhav thackeray slams bjp)