अजितदादांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी ‘ती’ भाषा शिकणार: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केले. (CM Uddhav Thackeray taunt ajit pawar at Shivaji Maharaj's birth anniversary programme)
शिवनेरी: शिवाजी महाराजांना अनेक भाषा येत होत्या. त्यातली एक भाषा अजितदादांनाही येते. आता मला ती भाषा शिकायची आहे. दादांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे कळलं पाहिजे म्हणून मी ती भाषा शिकणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगताच एकच खसखस पिकली. शिवजयंती निमित्त शिवनेरीवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. (CM Uddhav Thackeray taunt ajit pawar at Shivaji Maharaj’s birth anniversary programme)
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवर येऊन शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आदी उपस्थित होते. महाराजांना अभिवादन केल्यानंतर शिवनेरीवर सभा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे मिश्किल भाष्य केलं. शिवाजी महाराजांना अनेक भाषा यायच्या. त्यातली एक भाषा मला माझ्या सहकाऱ्यानं सांगितली. अजितदादांना ती भाषा येते. आता मला ती भाषा शिकायची आहे. दादांच्या मनात काय चाललं ते कळलं पाहिजे म्हणून मी ती भाषा शिकणार आहे, असं मिश्किल भाष्य मुख्यमंत्र्यांनी करताच एकच खसखस पिकली.
आपल्या धमण्यात शिवाजी
शिवरायांपुढे नतमस्तक व्हायला शिवजंयतीच पाहिजे असं नाही. कोणतंही पवित्र काम करताना शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. दुसरे वर्ष आहे शिवनेरीवर येण्याचे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने लाभला आहे. मनात, हृदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. त्यांना वंदन करण्यासाठी शिवजयंतीची गरज नाही. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
युद्ध जिंकण्यासाठी एक जिगर लागते
छत्रपतींनी ज्या काही लढाया केल्या त्यात त्यांनी शत्रूला पराभूत केले. त्यांच्या ढाल तलवारी आज नसल्या तरी कोरोना या शत्रूशी लढाई करताना मास्क ही आपली ढाल आहे, हे विसरू नका. छत्रपती दैवत का आहे. तर युद्ध जिंकण्यासाठी एक जिगर लागते, युद्धावर जाताना तलवार हातात पकडण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांनी दिलीय. पण आता कोरोनासारखा दुश्मन आहे. त्यावर आपल्याला मात करायची आहे, असं सांगतानाच साप तसे अजूनही आहे. काही साप चावतात. तर काही चावत नाहीत. त्यांना ठेचायचं असतं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर नाव न घेता टीका केली. (CM Uddhav Thackeray taunt ajit pawar at Shivaji Maharaj’s birth anniversary programme)
काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करतात
काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करतात, त्या थांबल्या गेल्या पाहिजे. पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. पुन्हा अशा घडू नये यासाठीची खबरदारी प्रशासनानं घ्यायला पाहिजे. त्यामुळेच यंदा कोरोनामुळे शिवजयंती साजरी करण्यावर मर्यादा आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. कोरोना नियमांचे पालन करुन शिवजयंतीचा आनंदोत्सव राज्याच्या घराघरात, मनामनात साजरा होऊ दे, असे आवाहन त्यांनी केले. “महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँ साहेबांसमोर आज शिवजयंतीदिनी पुन्हा एकदा नतमस्तक होतो असं सांगत अजित पवार यांनी शिवरायांना मानाचा मुजरा करत त्रिवार वंदन केले. (CM Uddhav Thackeray taunt ajit pawar at Shivaji Maharaj’s birth anniversary programme)
Shivjayanti | शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्म सोहळ्याची जय्यत तयारीhttps://t.co/Fvjrdpfp1W#ShivajiMaharajJayanti #ShivJayanti #ShivajiJayanti
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 19, 2021
संबंधित बातम्या:
किल्ले शिवनेरीवर संचारबंदी, मात्र गडाच्या पायथ्याशी शिवभक्तांचा उत्साह कायम
शिवजयंतीवर बंधनं घालायला ही काय मोगलाई आहे काय?; देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
शशिकांत शिंदेंसोबत दिलजमाईचे संकेत, शिवेंद्रराजेंचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’?
(CM Uddhav Thackeray taunt ajit pawar at Shivaji Maharaj’s birth anniversary programme)