…तर दोन दिवसात महाराष्ट्रात लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचा मोठा इशारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे (CM Uddhav Thackeray warn about lockdown in Maharashtra).

...तर दोन दिवसात महाराष्ट्रात लॉकडाऊन, मुख्यमंत्र्यांचा मोठा इशारा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Apr 03, 2021 | 2:26 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे. लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुढच्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. हा आकडा वाढू नये यासाठी लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते (CM Uddhav Thackeray warn about lockdown in Maharashtra).

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

“आपल्याला जनतेचा जीव वाचवायचा आहे. मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघेन. सर्व अधिकाऱ्यांकडून आढावा घेईन. राज्यात बदल दिसला नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनबाबतचा निर्णय घेण्याबाबतचा इशारा देतोय. त्यामुळे आतापासून आपण ठरवूया. आपण ही लाट रोखूच. याशिवाय यापुढची लाटही रोखूया”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘विरोधकांनी राजकारण करु नका’

“मधल्या काळात कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो. अजूनही कोरोनाने मात केलेली नाही. आपणच त्याच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं (CM Uddhav Thackeray warn about lockdown in Maharashtra).

‘जगभरातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन’

“अनेक देशांमधील परिस्थिती नाजूक आहे. फ्रान्समध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन लागू, या लॉकडाऊन काळात जीवनाश्यक वस्तूंच्या दुकानांना उघडण्यासाठी परवानगी देण्यात आली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद, सर्व राजकीय कार्यक्रमांना बंदी, अशी फ्रान्समधील परिस्थिती आहे. हंगेरीमध्येही वर्क फ्रॉम होम, डेनमार्कमध्येही तीच परिस्थिती, ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध हटवण्यास सुरुवात झाली आहे. बेल्जियमने एक महिना परत लॉकडाऊन लागू केलाय. पोर्तूगाल सरकारने शहराशहरामधील नागरिकांची ये-जा थांबवली आहेत. आयर्लंडमध्ये डिसेंबर पासून कडक निर्बंध आहे. फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहे. यूकेतही अडीच-तीन महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर शिथिलता दिली जाते. इटली, जर्मनीतही तीच अवस्था आहे. लॉकडाऊन घातक आहे. पण एका कात्रीत आपण सापडलोय. एका बाजूला अर्थचक्र आहे. अर्थचक्र चालू ठेवलं तर अनर्थ घडतोय”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

…तर सुविधा अपुऱ्या पडतील : मुख्यमंत्री

“आज 45 हजार नवे रुग्ण वाढण्याची शक्यता. आपण कोणत्या दिशेला चाललोय? याच वेगाने जर रुग्णवाढ होत राहिली तर.. विगलीकरणात सध्या 2 लाख 20 हजार बेड्स आहेत. त्यापैकी 1 लाख 37 हजार बेड्स भरले गेले आहेत. म्हणजे 65 टक्के बेड्स भरले आहेत. आयसीयू बेड्स हे 20519 आहेत. ते जवळपास 48 टक्के भरले आहेत. ऑक्सिजन आणि व्हेंटिलिटर्स बेड्स 25 टक्के भरले आहेत. ही परिस्थिती अशीच राहीली तर सर्व सुविधा अपुऱ्या पडतील”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का? वाचा लाखमोलाच्या सवालावर मुख्यमंत्र्यांचं थेट उत्तर

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.