उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जळगावमध्ये 12 अंश सेल्सियस नीचांकी तापमानाची नोंद

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून नाशिकचे तापमान 12.8 पर्यंत खाली आले आहे. तर जळगावमध्ये राज्यात सर्वात नीचांकी 12 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे.

उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जळगावमध्ये 12 अंश सेल्सियस नीचांकी तापमानाची नोंद
उत्तर महाराष्ट्रात मंगळवारपासून थंडी वाढण्याची शक्यता आहे.
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 10:58 AM

नाशिकः उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून नाशिकचे तापमान 12.8 पर्यंत खाली आले आहे. तर जळगावमध्ये राज्यात सर्वात नीचांकी 12 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे.

गोदातीरावर वसलेल्या नाशिकच्या मंतरलेल्या चैत्रबनात अखेर हुडहुडी भरवणारी थंडी वाढत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बांधून ठेवलेले स्वेटर, कानटोप्या, जॅकेट आता बाहर निघाले आहेत. सप्टेंबर महिन्यात नाशिककरांना तुफान पावसाने झोडपले. रोज पाऊस मुक्कामी होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्येही त्याने अनेकदा हजेरी लावली. हवामान विभागाने 25 ऑक्टोबरनंतर पावसाळी वातावरण हटण्याचे भाकित व्यक्त केले होते. विशेष म्हणजे ते खरे ठरताना दिसत असून, आता थंडी आणि धुक्याच्या दुलईत नाशिक गुरफटून जात आहे. मौसम सुहाना झाल्यामुळे सकाळी बाहेर फिरायला जाणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. गोदाकाठावर अनेक ठिकाणी रात्री व पहाटे शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. उत्तर महाराष्ट्रात शनिवारी जळगावमध्ये राज्यात नीचांकी बारा अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

दिवाळीत म्हणे पाऊस

ऐन दिवाळीत म्हणजेच एक ते तीन नोव्हेंबर दरम्यान राज्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या बंगलचा उपसागर आणि तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवसांत ते पश्चिमकडे सरकणार असल्याने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या काळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

थंडी वाढणार

नाशिककरांना यंदा सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. एकाच महिन्यात मनमाड, नांदगावसारख्या ठिकाणी दोनदा अतिवृष्टी झाली. शिवाय जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली. गोदावरी नदीला यंदा महिनाभरात चार पूर आले. हे पाहता आता येत्या काळात थंडीही जोरदार पडणार असल्याचा अंदाज आहे. पावसाप्रमाणेच थंडीचा सुद्धा कहर होऊ शकतो. हे सारे हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमी करत आहेत.

इतर बातम्याः 

गुन्हेगारांच्या नांग्या ठेचत उत्तर महाराष्ट्रात 7 कोटींचे अमली पदार्थ जप्त; वेगवेगळ्या प्रकरणांत 171 आरोपींना बेड्या

मनसे फॉर्मातः पालकमंत्री भुजबळांची भेट घेत नाशिकमधल्या उड्डाणपुलाला विरोध; काम सुरू झाल्यास कोर्टात जाण्याचा इशारा

पुन्हा वांदेः ‘डीपीसी’वरून आमदार कांदेंचा पंगा सुरूच; निधी वर्ग करू नका, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत थेट आत्मदहनाचा इशारा

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.