Maharashtra Weather Update: राज्यात गार वारे, अनेक शहरांमध्ये तापमान घसरले, दोन दिवस थंडीच्या लाटेचा आयएमडीचा इशारा

cold wave in maharashtra: उत्तरेतील अतिशीत वारे छत्रपती संभाजीनगरकडे वाहून येत आहेत. त्यामुळे राज्यात जळगाव शहरात ८.४, अहिल्यानगरमध्ये ८.७ आणि नागपूरमध्ये ९.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बुलडाणा, अकोला शहरांत तापमान १०.६ अंश होते.

Maharashtra Weather Update:  राज्यात गार वारे, अनेक शहरांमध्ये तापमान घसरले, दोन दिवस थंडीच्या लाटेचा आयएमडीचा इशारा
महाराष्ट्रात थंडी
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 12:33 PM

Maharashtra Weather Update: उत्तेरकडे थंड वाऱ्यांचा जोर वाढला आहे. अंदमानच्या समुद्रात कमी दाबचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमान घसरले आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानात प्रचंड घट झाली आहे. धुळ्यात 4.1 अंश सेल्सियस अशा नीच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात आणखी दोन दिवस थंडीचा लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

थंडीच्या लाटेचा इशारा

पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये थंडीचा जोर वाढला. पुणे शहरात शनिवारी १०.१ डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील किमान तापमान घसरले आहे. सध्या अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आहे. तसेच चक्रकार वाऱ्यांची स्थिती समुद्र सपाटीपेक्षा 5.8 किमी आहे. यामुळे महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे. राज्यात हाडे गोठवणारी थंडी पडणार असल्याचे हवामान विभागने म्हटले आहे.

पुणे चांगलेच गारठले आहे. पुण्याचा पारा दहा अंशांखाली आला आहे. पुणे येथील एनडीए परिसरात ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी पहाटे एनडीए परिसरात नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर हवेली, माळीण, दौंड आणि शिवाजीनगर परिसरातील किमान तापमान दहा अंशांखाली नोंदवले गेले. मागील चार दिवसांपासून हवामानातील बदल आणि निरभ्र आकाश यामुळे किमान तापमानात झपाट्याने घट झाली आणि पारा ११ अंशापर्यंत खाली आला. मात्र, गेल्या २४ तासांत पारा दोन ते तीन अंशांनी घटला.

हे सुद्धा वाचा

निफाडमध्ये 3.8 अंश सेल्सिअस तापमान

थंडीच्या कडाक्यामुळे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचा पारा घसरला आहे. निफाड तालुक्यातील ओझर येथे राज्यात किमान तापमानाची निच्चाकी नोंद झाली आहे. ओझरमध्ये 3.8 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवले गेले. कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रात 6.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.या थंडीमुळे द्राक्ष मण्यांना तडे जाण्याची भीती आहे.

डिसेंबरमध्ये प्रथमच नीच्चांकी तापमान

उत्तरेतील अतिशीत वारे छत्रपती संभाजीनगरकडे वाहून येत आहेत. त्यामुळे राज्यात जळगाव शहरात ८.४, अहिल्यानगरमध्ये ८.७ आणि नागपूरमध्ये ९.४ अंश तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बुलडाणा, अकोला शहरांत तापमान १०.६ अंश होते. डिसेंबरमध्ये शहरात किमान तापमान प्रथमच १०.६ अंश नीचांकी पातळीवर गेले. यापूर्वी डिसेंबर २०२२ च्या पहिल्याच आठवड्यात १०.८ व त्यापेक्षा कमी तापमान गेल्याची नोंद आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये ११.७ अंश तापमानाची नोंद झाली. जालना शहराचा पारा ९ अंशावर आला आहे. गोंदिया जिल्ह्यात जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.