9 नोव्हेंबरपासून थंडी वाढणार, तूर्तास नाशिकमध्ये प्रदूषण वाढले
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मंगळवारपासून थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता, हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली. मात्र, तूर्तास तरी नाशिकच्या हवेमध्ये प्रदूषण वाढले आहे.
नाशिकः नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मंगळवारपासून थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता, हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली. मात्र, तूर्तास तरी नाशिकच्या हवेमध्ये प्रदूषण वाढले आहे.
उत्तर महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी थंडी वाढली होती. 30 ऑक्टोबर रोजी नाशिकचे तापमान 12.8 पर्यंत खाली आले, तर जळगावमध्ये राज्यात सर्वात नीचांकी 12 अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली. त्यापूर्वी 23 ऑक्टोबर रोजीही नाशिकमध्ये राज्यात नीचांकी अशा 14.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऐन दिवाळीत थंडी वाढणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता अचानक हवामान बदल झाला. आता 9 नोव्हेंबरनंतर थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्रासह संपूर्ण दक्षिण भारतात सध्या ऐन दिवाळीत पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी केली. बंगालचा उपसागर आणि तामिळनाडूच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ते पश्चिमकडे सरकल्याने पावसाचा अंदाज आहे. या काळात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
प्रदूषण वाढले
सध्या नाशिकमध्ये हवेने प्रदूषणाची खूप उच्च पातळी गाठली आहे आणि संवेदनशील लोकांसाठी ती रोगट आहे. जर आपल्याला श्वास घेण्यात अडचण येत असेल किंवा घसा खवखवत असेल तर तो प्रदूषणाचा परिणाम असू शकतो. सध्या नाशिकमध्ये AQI 71 वर गेला आहे. दरम्यान, नाशिककरांना यंदा सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाने झोडपून काढले. एकाच महिन्यात मनमाड, नांदगावसारख्या ठिकाणी दोनदा अतिवृष्टी झाली. शिवाय जिल्ह्यातील सर्व धरणे तुडूंब भरली. गोदावरी नदीला यंदा महिनाभरात चार पूर आले. हे पाहता आता येत्या काळात थंडीही जोरदार पडणार असल्याचा अंदाज आहे. पावसाप्रमाणेच थंडीचा सुद्धा कहर होऊ शकतो. हे सारे हवामान बदलाचे परिणाम आहेत. त्यामुळे सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन पर्यावरण प्रेमी करत आहेत.
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरनंतरच थंडीचा कडाका वाढेल. सध्या दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावेल. त्यात कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगलीतही तुरळक पाऊस होईल. – श्रीनिवास औंधकर, संचालक, एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, एमजीएम, औरंगाबाद (Cold will increase from November 9, pollution has increased in Nashik)
इतर बातम्याः
केंद्र-राज्यात लसीकरणाचा वाद नाही; त्र्यंबकेश्वर येथे देवेंद्र फडणवीस यांचा दावा
NashikGold: पाडव्यादिवशी महागाईचा गोडवा; सोन्या-चांदीच्या किमती वाढल्या!
Special Report: तुझं हसणं माझ्या जगण्याची भाकरीय; जगात सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या एका मुलखावेगळ्या कवीची गोष्ट!https://t.co/rIFR65qDOq#SpecialReport|#PabloNeruda|#Poet|#RevolutionaryPoet|#Chile
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 3, 2021