कल्याणमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरूच; महाविद्यालयीन तरुणाला ‘थार’ने उडवलं, अपहरणाचा प्रयत्न, Video
कल्याणमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, परप्रातीयांची दादागिरी सुरूच आहे. एका महाविद्यालयीन तरुणाच्या अंगावर थार गाडी घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
![कल्याणमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरूच; महाविद्यालयीन तरुणाला 'थार'ने उडवलं, अपहरणाचा प्रयत्न, Video कल्याणमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरूच; महाविद्यालयीन तरुणाला 'थार'ने उडवलं, अपहरणाचा प्रयत्न, Video](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Untitled-design-2025-01-28T155441.959.jpg?w=1280)
कल्याणमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे, परप्रांतीय व्यक्तींकडून यापूर्वी मराठी माणसांना मारहाण झाल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. या घटना ताज्या असतानाच आता आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. कल्याण पूर्वेला एका परप्रांतीय तरुणाकडून मराठी विद्यार्थ्याच्या अंगावर थार गाडी घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला, जेव्हा हा प्रयत्न फसला तेव्हा त्याचं अपहरण करण्याचा देखील प्रयत्न झाला. मात्र स्थानिक लोकांनी वेळीच धाव घेतल्यानं हा प्रयत्न फसला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, या घटनेनं खळबळ उडाली आहे. या प्रकरणात कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कल्याण डोंबिवलीमध्ये परप्रांतीय लोकांची दादागिरी वाढतच असल्याचं दिसून येत आहे. डोंबिवलीमध्ये मराठी भाषा प्रकरणी अपशब्द वापरल्या नंतर इमारतीत जोरदार राडा झाला होता, याप्रकरणी आज गुन्हा दाखल झाला असून कारवाई सुरू असतानाच पुन्हा एकदा कल्याण-डोंबिवली परिसरात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कल्याणमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे, परप्रातीयांची दादागिरी सुरूच आहे. एका महिविद्यालयीन तरुणाच्या अंगावर थार गाडी घालून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. pic.twitter.com/3hJIC7Vhyg
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2025
कल्याणच्या लोकग्राम परिसरात एका परप्रांतीय तरुणाने मराठी विद्यार्थ्यावर थार गाडी चढवून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. एवढ्यावरच न थांबता, त्याचं अपहरण करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. श्लोक सावंत असं या पीडित विद्यार्थ्याचं नाव आहे तर सुयश तिवारी असं हल्ला व अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांकडून तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेनंतर प्रतिक्रिया देताना श्लोक सावंत याच्या आईने म्हटलं की “आम्ही मराठी महाराष्ट्रात सुरक्षित नाही तर कुठे सुरक्षित राहणार” असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. दरम्यान सध्या हा वाद नेमका कशाचा आहे? याचा तपास कल्याण कोळशेवाडी पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.