महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम

आता ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत आणि कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेलेच विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम
vaccination
Follow us
| Updated on: Oct 20, 2021 | 7:23 PM

मुंबई: आता ऑफलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत आणि कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस झालेलेच विद्यार्थी ऑफलाईन उपस्थित राहू शकणार आहेत. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. (colleges to start in maharashtra vaccine to students uday samant)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागासोबत बैठक घेऊन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेतून प्रत्येक महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला लस उपलब्ध होईल याची काळजी घेतली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईच्या सिडनॅहम महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सामंत बोलत होते.

सामंत म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनी ही सामाजिक अंतर राखून, मास्क लावून वर्गात उपस्थिती लावावी. महाविद्यालयांनीही विद्यार्थी-पालक यांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा. आज काही महाविद्यालय सुरु झाली नसली तरी येत्या 25 ऑक्टोबर पासून महाविद्यालय सुरु होतील, असं उदय सामंत म्हणाले. कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या मार्च 2020 पासून बंद असलेली महाविद्यालय ऑफलाईन पद्धतीनं आजपासून सुरु होत आहेत.

जरी कॉलेजेसला नियोजन करण्यासाठी किंवा कॉलेज सुरू करण्यासाठी वेळ मिळाला नसला तरी त्यांनी टप्प्याटप्प्याने कॉलेज सुरू करावे. आज आरोग्य विभाग संचालिका अर्चना पाटील यांच्यासोबत सुद्धा एक बैठक आहे. यामध्ये कॅम्पस मध्ये लसीकरण कशा प्रकारे करावे याबाबत आम्ही चर्चा करत आहोत. जेणेकरून कॅम्पस मध्येच विद्यार्थ्यांना पहिला डोस दुसरा डोस देता येतील. ही मोठी मोहीम आम्ही पुढच्या आठवड्यात विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याच्या विचारात आहोत, असं उदय सामंत म्हणाले.

इतर बातम्या

पापाचा घडा भरला, राजस्थानातून मुंबईत 21 कोटींच्या हिरॉईनची स्मगलिंग, मुंबईतील टॉप ड्रग्ज पेडलर महिला अखेर जायबंद

भाजप देगलूरमध्ये 20 हजारांच्या लीडनं विजयी होणार, बबनराव लोणीकरांची भविष्यवाणी, अशोक चव्हाणांवरही टीकास्त्र

भिवंडीत कॉलेजमध्ये पाऊल ठेवताच विद्यार्थ्यांना लस टोचल्या; महापालिकेची लसीकरण मोहीम जोरात

(colleges to start in maharashtra vaccine to students uday samant)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.