आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला या… उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदी यांना निमंत्रण

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार आज संपला. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबईत अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अनेक भागात जाऊन मतदारांशी, शिवसैनिकांशी संवाद साधला. हा संवाद साधत असताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाही चढवला आहे.

आमच्या पंतप्रधानांच्या शपथविधीला या... उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदी यांना निमंत्रण
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 18, 2024 | 6:37 PM

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं आहे. येत्या 4 तारखेचं मोदीजींना आजच आमंत्रण देतोय. मोदीजी, तुम्ही आमच्या इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीचं आमंत्रण देतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना बोलवायचं आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी डिवचलं. आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. दादर येथे संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी चांगलीच टोलेबाजी केली.

मी काहीही बोललो तरी शब्दांचा चुकीचा अर्थ काढतात. काल फडणवीस म्हणाले मी हिॅदू शब्द सोडला. मी भाजपला लाथ घातली. पण हिॅदूत्त्व नाही सोडलं. आम्ही मोदीभक्त नाही, देशभक्त आहोत. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण आहे. आता मोदी संघाला नकली संघ म्हणतील तो दिवसही दूर नाही. जेपी नड्डा यांनी तर आम्ही स्वयंपूर्ण झालोय. संघाची गरज नाही, असं म्हटलंय. 2025 मध्ये संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. संघासाठी 100 वरीस धोक्याचं आहे. कारण संघ नसणार आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

कारभार दुसऱ्यांच्या भरवश्यावर

आम्ही कुणातही विलीन होणार नाही. 4 जूननंतर भाजपची हालत काय होणार? हे निवडणूक लढायला निघाले आहेत. यांच्या नावावर मैदान बुक होत नाही. भाडोत्री लोकांकडून मैदान घेतलं. भाडोत्री वक्ते आणले. सगळा कारभार दुसऱ्यांच्या भरवश्यावर आहे, असा चिमटाही उद्धव ठाकरे यांनी काढला.

मुंबईला भिकारी करत आहात?

भाजपने या दहा वर्षात मुंबईचे उद्योग, हिरेबाजार आणि इतर उद्योग गुजरातला नेले. सगळं गुजरातच्या घशात घातलं. तुम्ही मुंबईला भिकारी करत आहात, असा हल्ला त्यांनी चढवला. मनपाची परवानगी नसताना होर्डिंग्ज उभारली. घटनेनंतर दोन दिवसांनी मोदींनी रोड शो केला. रोड शोसाठी मुंबई मनपाचे 5 ते 10 कोटी रुपये खर्च झाले, असं ते म्हणाले.

कट्टर शिवसैनिक हवा

भाजपमध्ये गोंधळाची स्थिती आहे. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत. इतर उमेदवार पळवावे लागत आहेत. गोंधळ घालण्यासाठीच आपली निशाणी चोराच्या हाती दिली. काही ठिकाणी नोटा वाटल्या जात आहेत. काही ठिकाणी तर खोट्या नोटा वाटल्या जात आहे. आपल्याला आता सुपारीबाज नको. धोकेबाज नको. कट्टर शिवसैनिक हवा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.