गवा प्राण्याची संपुर्ण माहिती एका क्लिकवर, कळप आढळल्यास या क्रमांकावरती संपर्क साधा
ग्रामस्थांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. आपल्या परिसरात गवा या वन्य प्राण्यांचा वावर आहे, असे आढळून आल्यास सर्व ग्रामस्थांनी खालील सुचनांचे पालन करावे असे वन विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील शिराळा (shirala) तालुक्यात गव्याचं प्रमाण अधिक आहे. त्याच कारण असं आहे की, शिराळा तालुक्याला चांदोली अभायरण्याचा काही भाग येत असल्यामुळे गव्याचं प्रमाण अधिक आहे. गवा हा प्राणी कळपाने राहत असल्यामुळे शेतकऱ्यांवर कधीही हल्ला करु शकतो. त्याचबरोबर त्यांच्या अधिक ताकद असल्यामुळे हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शिराळा तालुक्यातील रिळे गावात मागच्या आठवड्यात सहा गव्यांचा (gava) मृत्यू झाल्यानंतर एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अजितकुमार पाटील, वन विभाग सांगली (forest department sangli) यांच्याकडून ही माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे.
- गव्याच्या प्रचंड आकारामुळे माणसाला भीती वाटू शकते पण गवा मात्र लाजाळू असतो. गवत, पानं खाऊन जगतो.
- गवा प्राण्याचे शरीर लालसर ते तपकिरी कोटाने झाकलेले असते. वय वाढत जाईल तसे हा कोट काळा होत जातो. मादी व पिल्लाचा रंग नर गव्याच्या रंगा पेक्षा थोडा फिकट असतो
- गवा हा आपल्या राज्यात आढळणाऱ्या खुर धारी प्राण्यात सर्वात मोठा प्राणी आहे. पूर्ण वाढ झालेल्या गव्याचे वजन १०० ते २२०० किलो दरम्यान असते. त्यांची लांबी ८ ते ११ फूट आणि खांद्याच्या उंचीवर ५ ते ७ फूट पर्यंत पोहोचू शकते.
- गवाच्या कपाळावर पांढऱ्या कलरचा मोठा ठिपका असतो, त्यांच्या डोक्यावर मोठे कान हे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. शिंगाचे टोक हे पिवळसर पांढरे असते.
- गवा हे प्रामुख्याने सकाळी लवकर आणि दुपारी उशिरा सक्रिय असतात. मानवाच्या जवळच्या भागात, गवा आपली सामान्य दिनचर्या बदलू शकतात आणि निशाचर प्राणी बनू शकतात (रात्री सक्रिय).
- त्यांच्या मोठ्या आकारामुळे, गवा प्राण्याला खूप शत्रू नसतात. ( मनुष्यांव्यतिरिक्त)
- गवा प्राणी हे शाकाहारी आहेत (वनस्पती खाणारे). त्यांच्या आहारात गवत, पाने, कोंब आणि फळे असतात.
- गवा सामान्यत: गटात (कळप) राहतात. या गटांमध्ये एक प्रबळ नर आणि मादी असतात. चुकून कळपातून भरकटले तर ते शेतातून वाटकाढत फिरताना आढळतात.
- गवा हे प्रादेशिक प्राणी आहेत. एका गटाला सुमारे ३० चौरस मैलांचा प्रदेश आवश्यक आहे.
- गवा संवादासाठी विविध प्रकारचे आवाज तयार करतात.
- नर आणि मादी दोघांनाही वरच्या दिशेने वक्र शिंगे असतात. त्यांची लांबी सर्व साधारण ४५ इंच असते.
- त्यांच्या शरीरात अफाट स्नायूंची बांधणी आणि दणकट शरीराचा आकार असतो.
- गव्याला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे पायांचा रंग. पायात मोजे घालावे तसा हा रंग असतो. त्याला स्टॉकिंग्ज म्हणतात. हा रंग गव्याला म्हशींपासून वेगळा करतो.
- गवे सहसा माणसांवर हल्ले चढवत नाहीत. गव्यांमध्ये आपापसात मारामारी होतात पण मुद्दाम त्यांनी माणसावर हल्ला केला असं होत नाही.
- आवाज व माणसांच्या गर्दीमुळे गवे बिथरून / घाबरुन पळून जातात, जर वाट मिळाली नाही तर हल्ले सुद्धा करतात, तरी सर्वांनी काळजी घेणे गरजेच आहे
ग्रामस्थांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे. आपल्या परिसरात गवा या वन्य प्राण्यांचा वावर आहे, असे आढळून आल्यास सर्व ग्रामस्थांनी खालील सुचनांचे पालन करावे असे वन विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.
- गावातील इतर नागरीकांना तात्काळ सतर्क / सावध करावे.
- गव्याच्या जवळ जाण्याचा किंवा माग काढण्याचा प्रयत्न करु नये.
- गव्याचा वावर असलेल्या शेतात एकटे-दुकटे जाऊ नये.
- गाव्याच्या दिशेने फटाके, दगड, काठी यांचा मारा करु नये.
- गवा प्रवण क्षेत्रात संध्याकाळी ६ च्या नंतर घराच्या बाहेर पडू नये.बाहेर पडावयाचे झालेस मोठ्या प्रकाशझोताची बॅटरी वापरात आणावी.
- गव्याने शेताचे / मालमत्तेचे नुकसान केल्यास ते तात्काळ संबंधित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे.
- लोकांनी जमाव करुन गव्याचा जाणेयेणेचा मार्ग अडवून धरु नये.
- गव्या कडून पीक नुकसानी झालेस भरपाई करणेस वनविभाग बांधील राहील.
- तरी वरील सर्व सुचनांचे काटेकोर पालन करुन वनविभागास सर्वांनी सहकार्य करावे.
- गव्याचा वावर दिसून आलेस तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. किंवा 1926 ह्या नंबर वर माहिती कळवा
- वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अनुसूची एक नुसार गवा हा संरक्षित प्राणी असून त्यास इजा करणारी व्यक्ती कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील याची नागरीकांनी कृपया नोंद घ्यावी.